Sections

कऱ्हाड : रस्ता रूंदीकरणासाठी तोडले २७ वृक्ष

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 23 एप्रिल 2018
trees

कऱ्हाड - कऱ्हाड ते तासगाव रस्त्याच्या रूंदीकरणासाठी सुमारे २७ मोठे वृक्ष तोडण्यात आले. हे वृक्ष तोडण्यासाठी संबधित ठेकेदाराने पालिकेची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे पालिका वृक्ष प्राधिकरणाने पोलिसात कायदेशीर तक्रार दिली आहे. 

मुख्य ठेकेदार प्रवीण नायडू-तट्टू यांच्यासह तिघांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी तक्रारीत दिली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या बाबत पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले आहेत. मुख्य ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. त्याबाबत रोहन भाटे यांनी लेखी तक्रार नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांच्याकडे दिली आहे.

Web Title: Karhad: 27 trees cut for road widening

टॅग्स