Sections

कान्हुर पठार पतसंस्थेला 2 कोटी 54 लाख रुपयांचा नफा - दिलीप ठुबे  

सनी सोनावळे |   सोमवार, 2 एप्रिल 2018
dilip-thube

टाकळी ढोकेश्वर (नगर ) : कान्हुर पठार (ता.पारनेर) येथील कान्हुर पठार पतसंस्थेला या वर्षात 2 कोटी 54 लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती कार्यकारी संचालक दिलीप ठुबे यांनी दिली.

संस्थेने 31 मार्च या दिवशी नफा-तोटा व ताळेबंदपत्रक जाहीर करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. सर्व तरतुदी वजा जाता संस्थेस 1 कोटी 44 लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

टाकळी ढोकेश्वर (नगर ) : कान्हुर पठार (ता.पारनेर) येथील कान्हुर पठार पतसंस्थेला या वर्षात 2 कोटी 54 लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती कार्यकारी संचालक दिलीप ठुबे यांनी दिली.

संस्थेने 31 मार्च या दिवशी नफा-तोटा व ताळेबंदपत्रक जाहीर करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. सर्व तरतुदी वजा जाता संस्थेस 1 कोटी 44 लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

ठुबे म्हणाले, "एनपीएसाठी 55 लाखाची तरतुद केली त्यामुळे संस्थेची या वर्षाअखेर 8 कोटी 65 लाख रूपयांची एनपीए तरतुद झाली आहे या वर्षात ठेंवीमध्ये वाढ होत असुन, 240 कोटी रूपयांच्या ठेवी आहेत संस्थेने 162 कोटी रूपयांचे कर्जवाटपही केले आहे खेळते भागभांडवल 370 कोटी रूपये आहे विविध बँकासह इतर गुंतवणुक 120 कोटी झाली आहे.

संस्थेचे अध्यक्ष सुभाष नवले म्हणाले, नोटबंधी, उद्योग, व्यापार, मंदी, शेतमालाचे पडलेले भाव या सर्व परिस्थितीत संस्थेच्या ठेवींमध्ये 26 कोंटीची वाढ आहे. संस्थेला ऑडीट वर्ग 'अ' मिळत आहे ठुबे यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे त्यांना फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट यांच्याकडुन महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातुन कार्यकुशल व्यवस्थापनाकरिता दिला जाणारा सर्वोत्कृष्ठ कार्यकारी संचालक पुरस्कार देण्यात आला. ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा 'बँको' व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मार्फत दिला जाणारा ज्ञानदिप पुरस्कार मिळविण्याचा बहुमान संस्थेस मिळाला.

संस्थेची अद्यावत कोअर बँकीग सुविधा चालु असुन एस.एम.एस बँकिग, मोबाईलअॅप, आरटीजीएस यासारख्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र व्यवहारे उपस्थित होते.

Web Title: kanhur pathar patsanstha has 2 crore 54 thousand profit said by dilip thube

टॅग्स

संबंधित बातम्या

‘विराट’ घेण्यास महाराष्ट्र इच्छुक 

मुंबई : भारतीय नौदलात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या विराट या युद्धनौकेचा ताबा घेण्यास महाराष्ट्र सरकार इच्छुक आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारच्या...

विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात 24 जण बुडाले 

मुंबई  - गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असतानाच काही दुर्घटनांमुळे उत्साहावर विरजण पडले. मिरवणुकीदरम्यान रविवारी राज्यभरात किमान 24 जणांचा...

पोलिसांना ‘घरचा डबा’

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस...

अर्थमंत्री जेटलींची उद्या बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक

नवी दिल्ली :केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उद्या (मंगळवार) सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत बॅंकांच्या वार्षिक...

A rare snake found in the Bhaipur rehab at Aarvi
भाईपुर पुनर्वसनात आढळला दुर्मिळ असलेला काळडोक्या साप

आर्वी (जि वर्धा) - आर्वी तालुक्यातील भाईपुर येथील रहिवाशी गजानन आहाके यांच्या इथे त्यांना साप आढळून आला असता त्यांनी आर्वी येथील पीपल्स फॉर ॲ...