Sections

जामखेड हत्याकांडाचा सहा जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 30 एप्रिल 2018
crime

जामखेड -शहरातील योगेश व राकेश राळेभात या बंधूंच्या हत्येप्रकरणी जामखेड पोलिसांनी काल रात्री उशिरा गोविंद गायकवाड याच्यासह सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी पसार झाले आहेत.

मृत योगेशचा भाऊ कृष्णा अंबादास राळेभात (वय ३४) यांनी जामखेड ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, गेल्या वर्षी जामखेडमधील उल्हास माने यांच्या तालमीतील पैलवानांबरोबर राजकीय फलक लावण्यावरून योगेशचे भांडण झाले होते. त्या रागातूनच शनिवारी सायंकाळी हे दुहेरी हत्याकांड झाले. 

शिंदेंना  रुग्णवाहिकेतून पळविले जामखेडमधील गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री राम शिंदे रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात आले. मात्र, त्या वेळी त्यांना संतप्त जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. समजावून सांगूनही जमाव शांत होत नव्हता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी जमावाच्या तावडीतून बाहेर काढीत शिंदे यांना अक्षरशः रुग्णवाहिकेतून पळविले.

‘जामखेड बंद’ला प्रतिसाद योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘जामखेड बंद’ला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यवहार आज पूर्णपणे बंद होते.  राळेभात बंधूंच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी आज ‘जामखेड बंद’ची हाक दिली होती.

Web Title: Jamkhed murder case

टॅग्स

संबंधित बातम्या

लोकसभेच्या तोंडावर राजकीय छत्र्या

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत...

dr uma kulkarni
अनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध

साने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...

madhav gadgil
देवाजीच्या मनात भरले भुंगेरे

सारी जीवसृष्टी एकात्म आहे. सर्व प्राचीन संस्कृती व आधुनिक विज्ञान बजावते, की मानवजात चराचर सृष्टीचा अविभाज्य घटक आहे; आणि सर्व संयम सोडून या सृष्टीवर...

औरंगाबादेत वाहनचालकाचा खून

औरंगाबाद : औरंगाबादेतील सिडको भागात राहणाऱ्या एका वाहनचालकाचा खून झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 21) पहाटे उघडकीस आली. मृत व्यक्ती ...

Robbery
'साई एक्स्प्रेस'वर दरोडा

औरंगाबाद - शिर्डी ते काकीनाडा ‘साईनगर एक्‍स्प्रेस’ अडवून दरोडेखोरांनी प्रवाशांना बेदम मारहाण करीत महिलांच्या अंगावरील लाखो रुपयांच्या दागिन्यांची लूट...