Sections

घरासमोर पेटवून दिलेल्या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू

सूर्यकांत वरकड  |   गुरुवार, 29 मार्च 2018
crime

आरोपींवर नातेवाइकांचा हल्ला 
आरोपींना अटक करून पोलिस ठाण्यात नेले जात असताना अश्‍विनीच्या नातेवाइकांनी त्यांना अडवून पोलिसांसमोरच बेदम मारहाण केली. कर्जत येथे पोलिस उप अधीक्षकांच्या कार्यालयाजवळच सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. 

नगर : घरासमोर उभ्या असलेल्या तरुणीला दोन तरुणांनी पाठीमागून येऊन पेटवून दिले. कोरेगाव (ता. कर्जत) येथे शनिवारी (ता. 24) दुपारी झालेल्या या घटनेत गंभीर भाजलेल्या या तरुणीचा आज जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अश्‍विनी किसन कांबळे (वय 20) असे तिचे नाव असून, तिच्या मृत्युपूर्व जबाबानुसार कर्जत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश बारकू अडसूळ (वय 23), किशोर छगन अडसूळ (वय 28, दोघे रा. कोरेगाव, ता. कर्जत) अशी आरोपींची नावे आहेत. 

अश्‍विनी शनिवारी दुपारी घरासमोर उभी असताना आरोपी शैलेश व किशोर पाठीमागून आले. घरामध्ये कोणी नसल्याचा अंदाज घेऊन त्यांनी तिच्या अंगावरील कपडे पेटवून दिले. त्यात ती गंभीर भाजली. कुटुंबीयांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी तिचा जबाब घेतला. त्यात तिने वरील माहिती दिली. त्यावरूनच कर्जत पोलिस ठाण्यात रविवारी (ता. 25) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अश्‍विनीचा आज मृत्यू झाला. त्यामुळे कर्जत पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले. 

दरम्यान, अश्‍विनीचा मृतदेह आज दुपारी कोरेगाव येथे नेला; मात्र आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा तिच्या नातेवाइकांनी घेतला. पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र ते भूमिकेवर ठाम होते. नंतर कर्जत पोलिसांनी सायंकाळी आरोपी शैलेश व किशोर अडसूळ यांना अटक केली. 

कर्जतचे पोलिस निरीक्षक वसंत भोये यांनी सांगितले, की पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, केवळ भांडणे झाल्याने आरोपींनी तिला पेटविल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पोलिस गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहेत.

आरोपींवर नातेवाइकांचा हल्ला  आरोपींना अटक करून पोलिस ठाण्यात नेले जात असताना अश्‍विनीच्या नातेवाइकांनी त्यांना अडवून पोलिसांसमोरच बेदम मारहाण केली. कर्जत येथे पोलिस उप अधीक्षकांच्या कार्यालयाजवळच सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. 

Web Title: girl set a blaze in Koregaon Nagar

टॅग्स

संबंधित बातम्या

जुन्नर : कोळवाडी येथे अपघातात दोन जण ठार एक  गंभीर जखमी

ओतूर (ता.जुन्नर) : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कोळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कवडधरा मंदिराजवळ दुचाकी आणि पिकअप यांची समोरासमोर...

pandharpur
पंढरपूरमध्ये गणरायाला निरोप

पंढरपूर : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सर्वच जण आनंदाने मिरवणूकीमध्ये सहभागी होतात. परंतु 24 तास ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना मात्र अशा...

पुणे : भव्य मिरवणुकीने दापोडीत गणरायाला निरोप

पुणे : गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष..ढोल ताशांचा दणदणाट...पारंपारीक बँड पथक..आकर्षक सजवलेल्या रथातुन निघालेल्या गणपती...

बारामतीत एकाकडून चार पिस्तुले आणि काडतुसे जप्त

बारामती शहर : येथील गुन्हे शोध पथकाने संशयावरुन हटकलेल्या युवकाकडून तब्बल चार गावठी बनावटीची पिस्तुले व दहा जिवंत काडतूसे सापडली. चार पिस्तुले एकाच...

बारामती शहरात पर्यावरणपूरक विसर्जन मिरवणूक

बारामती शहर : आदर्श गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची प्रथा यंदाही कायम ठेवत बारामतीतील बहुसंख्य मंडळे व कुटुंबानीही पर्यावरणपूरक विसर्जनाला पसंती दिली....