Sections

'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' अंतर्गत माणमध्ये काम सुरु

रुपेश कदम |   शनिवार, 31 मार्च 2018
grampanchayat

मलवडी- 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' ही महाराष्ट्र शासनाची योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून, यामुळे जमीन सुपिक होण्याबरोबरच पाणीसाठाही वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.

धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील पहिले काम परकंदी तलावातील गाळ काढण्यापासून सुरु झाले. कामाचा शुभारंभ प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी परकंदीचे सरपंच बाळासाहेब कदम, अनुलोमचे भागजनसेवक दादासाहेब जगदाळे व शेतकरी उपस्थित होते.

दादासाहेब कांबळे पुढे म्हणाले की, ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून, शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढावे यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पाझर तलावांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु, यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साठल्याने हे तलाव मृत अवस्थेत आहेत. म्हणूनच हा सुपीक गाळ शेतकऱ्यांना रॉयल्टी फ्री दिला जाईल आणि सोबत इंधन बिलही शासन अदा करेल. 

ते पुढे म्हणाले की, सन १९७२च्या दुष्काळामध्ये असंख्य तलाव बांधले गेले. परंतु आज त्यामध्ये प्रचंड गाळ साठला आहे. त्यामुळे या पाझर तलावांची उपयुक्तता कमी झाली आहे. पाझर तलावातील हा गाळ आपल्या जमिनीसाठी खूप उपयुक्त आहे. आपण हा गाळ आपल्या जमिनीत टाकून तिची उत्पादकता वाढवू शकतो आणि त्याच बरोबर पाणीसाठा सुध्दा.

अनुलोमचे भागजनसेवक म्हणाले की, माणदेश म्हणजे जवळ जवळ निम्म्याहून अधिक जमीन मुरमाड अन खडकाळ. हीच खडकाळ जमीन या गाळाने पूर्णपणे सुपीक होईल आणि आपलं उत्पन्न तिप्पट होईल. हा सुपीक गाळ जमिनीत टाकल्यानंतर रासायनिक खतांचा वापर किमान दोन तीन वर्षे तरी कमी होईल. यामुळे सेंद्रिय शेतीचा आपला दृष्टिकोन साध्य होईल. गेली अनेक दशके गाळ भरुन निकामी झालेले आपले पाझर तलाव पुनर्जीवित होतील. एवढं सगळं आपण फक्त तलाव गाळमुक्त करुन साध्य करणार आहोत.

Web Title: galmukta dharan jalayukta shivar yojana satara

टॅग्स

संबंधित बातम्या

इंदापूरातील चारशे हेक्टर जमिन होणार राखीव वने

कळस : इंदापूर तालुक्यातील सुमारे चारशे हेक्टर क्षेत्र संरक्षित वन जमिन म्हणून घोषित करण्यात येणार आहे. सरकारी मालकीच्या या जमिनीवरील  ...

petrol
जालन्यात पेट्रोलच्या दराचा भडका

जालना : परभणी नंतर आता जालना जिल्ह्यात पेट्रोल दराने नव्वदी पार केली आहे. सोमवारी (ता. 18) शहरासह ग्रामीण भागातील पंपावर पेट्रोलचा दर प्रति...

पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना युवा क्रीडा पुरस्कार

कराड : तीन वेळा महाराष्ट्र केसरी असलेल्या पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना यंदाचा युवा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. माजी...

Ganesh Aarti On Set Of Sur Nava Dhyas Nava Singing Program On Colors Marathi Channel
'सूर नवा ध्यास नवा'मध्ये छोट्या सुरवीरांनी केली गणरायाची स्थापना

चौसष्ट कलेची देवता अशी ओळख असलेला लाडका गणराया लहान मुलांचा सर्वात आवडता देव. गणरायांच्या आगमनाचे या बालमित्रांना कायमच वेध लागलेले असतात. अनेकांसाठी...

जत तालुक्यातील खलाटी गावात गांजा शेतीवर कारवाई

सांगली - जत तालुक्यातील खलाटी गावात गांजा शेतीवर पोलिसांनी कारवाई केली. यात 1 लाख 51 हजाराचा गांजा जप्त केला. याबाबत मिळालेली...