Sections

मुलींनीच केला आईसह तिघांचा खून

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 9 एप्रिल 2018
crime

सोलापूर : तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धनाथ साखर कारखाना परिसरातील तिहेरी खून प्रकरणात धक्कादायक माहिती सोमवारी समोर आली. कौटुंबिक त्रासाला कंटाळून धुना आणि वसन या बहिणींनीच आई, भाऊ आणि बहिणीचा खून केल्याची कबुली दिली आहे. 

सोलापूर : तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धनाथ साखर कारखाना परिसरातील तिहेरी खून प्रकरणात धक्कादायक माहिती सोमवारी समोर आली. कौटुंबिक त्रासाला कंटाळून धुना आणि वसन या बहिणींनीच आई, भाऊ आणि बहिणीचा खून केल्याची कबुली दिली आहे. 

मूळचे गुजरातचे असलेले रणसोड जाधव आणि त्यांचे कुटुंबीय तिऱ्हे येथील सिद्धनाथ साखर कारखाना परिसरात झोपडी करून राहायला होते. घरगुती कामाच्या कारणावरून आई हयातबाई, बहीण लाखी व भाऊ मफा हे तिघे धुना आणि वसन यांना सतत मारहाण करत होते. त्रासाला कंटाळेल्या बहिणींनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लोखंडी गजाने मारून आईसह तिघांना संपविले. खुनाच्या घटनेनंतर दोघीही पळून बसमधून गुजरातच्या दिशेने निघाल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघींचा शोध घेतला.

Web Title: daughters murdered with three their mother

टॅग्स

संबंधित बातम्या

food poison
पुण्यात नऊ वर्षाच्या मुलाचा विषबाधेमुळे मृत्यू 

पुणे : अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एका कुटुंबास उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्याने त्यांना सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान,...

इस्लामपूर येथे अपघातात उदमांजराचा बळी 

सांगली - इस्लामपूर येथे सांगली रस्त्यावर रेणुका मंदिराजवळ काल रस्ते अपघातात पट्टेरी शेपटीचे उदमांजर मृत्यूमुखी पडले. निशाचर अशा या प्राण्याचा...

Jyoti-Shinde
काटेरी चमच्याने पत्नीचा खून

औरंगाबाद - पत्नीच्या पोटात पतीने काटेरी चमच्याने खोलवर भोसकून त्यानंतर तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २५) पहाटे तीनच्या सुमारास...

solapur
सोलापूर : संयुक्ता आणि सोमनाथचा मृत्यू प्रेमप्रकरणातून झाल्याचा पोलिसांचा संशय

सोलापूर : मार्डी परिसरात मृतदेह सापडलेल्या संयुक्ता रमेश भैरी (वय 24, रा. मार्कंडेय वसाहत, सोलापूर) हिचा मृत्यू विषबाधेमुळे झाला आहे. तिचा कॉलेजचा...

अनैतिक संबंधातून खून; दोघांना जन्मठेप 

नाशिक : अनैतिक संबंधावरून दम दिल्याच्या रागातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा पती दशरथ ठमके यांचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा...