Sections

धरणांचा पाणीसाठा निम्‍म्‍याहून अधिक

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 18 एप्रिल 2018
Dam water

सातारा - पावसाळा संपल्यानंतर पुन्हा अवकाळी पावसानेही हजेरी लावलेली नाही. तरीही जिल्ह्यातील धरणांत ५० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. आणखी दोन महिने सहज पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे. तसेच उरमोडी, धोम, कण्हेरमधून कालव्यांव्दारे पाण्याची आवर्तने सुरू असल्याने दुष्काळी माणसह सर्व ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता जाणवत नसल्याचे चित्र आहे. 

सातारा - पावसाळा संपल्यानंतर पुन्हा अवकाळी पावसानेही हजेरी लावलेली नाही. तरीही जिल्ह्यातील धरणांत ५० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. आणखी दोन महिने सहज पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे. तसेच उरमोडी, धोम, कण्हेरमधून कालव्यांव्दारे पाण्याची आवर्तने सुरू असल्याने दुष्काळी माणसह सर्व ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता जाणवत नसल्याचे चित्र आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांत ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. सध्या उरमोडी धरणातील पाणी कालव्याद्वारे माणला तसेच सातारा तालुक्‍याला नदीतून पाणी सोडले आहे. यासोबत धोम आणि कण्हेर धरणातूनही कालव्यांव्दारे आवर्तने सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. याचे श्रेय गावोगावी झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांना जाते. त्यामुळे यावर्षी आतापर्यंत केवळ पाच टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

जिल्ह्यातील धरणांतही ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. सर्वाधिक ७२ टक्के पाणी उरमोडी धरणात आहे तर ४० टक्के पाणी कण्हेर आणि तारळी धरणात शिल्लक आहे. धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (द.ल.घ.मी.मध्ये) : उरमोडी १९९, कण्हेर १११, कोयना १६५८, तारळी ६६, धोम १७७, बलकवडी ३८, वीर १४९.

धरणांतील पाण्याची टक्केवारी धरणांतील आजचा व कंसात गेल्या वर्षी आजच्या दिवशीची पाण्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे : उरमोडी ७२.९९ (५४.४६), कण्हेर ४०.६९ (२९.७३), कोयना ५३.३५ (३१.७०), तारळी ४०.०६ (४७.०४), धोम ५३.४८ (३२.७३), धोम बलकवडी ५३.८८ (२८.१८), वीर ५६.०६ (५९.२२).

Web Title: dam water storage

टॅग्स

संबंधित बातम्या

sundeep waslekar
हवी विवाद-निराकरण यंत्रणा (संदीप वासलेकर)

विवादांना सकारात्मक वळण लागावं म्हणून प्रयत्न करून काही नवीन प्रक्रिया अमलात आणाव्या लागतात. गरज पडल्यास यंत्रणाही निर्माण कराव्या लागतात. भारतात...

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे दुष्काळी भागातील नागरीकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील.
पाणी, चारा नसल्याने जनावरांना कसे संभाळायचे? (व्हिडिओ)

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): साहेब, पिण्यासाठी पाणी नाही, चारा नसल्य़ाने जनावरांना कसे संभाळायचे यांची चिंता, दु्ष्काळी परीस्थीतीत हाताला काम मिळणे...

File photo
अतिक्रमित जागेवरील घर हक्काचे

अतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....

pradeep purandare
जलव्यवस्थापनात आपण कोरडेच

यंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...

muktapeeth
श्रमप्रतिष्ठा

कोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...

File photo
शहरावर पाणीसंकट

शहरावर पाणीसंकट   नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...