Sections

'सहा महिन्यांत आम्ही तिकडे, तुम्ही इकडे'

विजयकुमार सोनवणे |   सोमवार, 23 एप्रिल 2018
ramhari rupnawar

बापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट

सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त ताणू नका, अशी भविष्यवाणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार अॅड. रामहरी रूपनवर यांनी केला.

बापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट

सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त ताणू नका, अशी भविष्यवाणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार अॅड. रामहरी रूपनवर यांनी केला.

सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विधान परिषदेतील कामकाजासंदर्भात झालेल्या घटनांचा उहापोह त्यांनी यावेळी केला. अॅड. रूपनवर म्हणाले, अधिवेशनाच्या समारोपादिवशी विरोधी पक्षातील आमदारांनी जोरदार टोलेबाजी केली. सरकारला धारेवर धरले. त्यामध्ये मी आघाडीवर होते. मी उपस्थित केलेले मुद्दे एकल्यावर बापट म्हणाले, आम्ही इतकेही नालायक नाही आहोत हो. आणि हो, सहा महिन्यानंतर सभागृहातील चित्र बदलणार आहे. सभागृहात दोनच पक्ष. एक काँग्रेस व दुसरा भाजप. तुम्ही सत्तेत आल्यामुळे इकडे बसणार आणि आम्ही तिकडे बसणार इतकाच फरक असेल.

आमची तोंडे तुमच्या दिशेने आहेत. त्यामुळे मला सातत्याने चंद्रकांतदादांची खुर्ची विणवते आहे, की या इकडे..या इकडे.. हे एकल्यावर ते म्हणाले, इकडे आल्यावर दादांच्या खुर्चीवर बसणार होय, ..त्यावर मी उत्तर दिले, चंद्रकांतदादांच्या बसतोय कि शेजारच्या (मुख्यमंत्री) हे काही सांगता येणार नाही....अशी झलकही अॅड. रूपनवर यांनी यावेळी सांगितले. शिवसेना व भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी शिवसेना पाठिंबा काढून घेईल. त्यामुळे निवडणुकीला सज्ज व्हा, असेही ते म्हणाले.

तुमच्यावर जबाबदारी दिलेला गड जिंका, गडकरी करतो, असा शब्द कुणी आलतू-फालतूने नव्हे तर आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भावी पंतप्रधान राहूल गांधी यांनी दिला आहे. त्यामुळे कामाला लागा. कांग्रेसला विजयी करा. पुढील एप्रिल-मे मध्ये कदाचित मार्चमध्येच राहुलजी पंतप्रधान झालेले दिसतील, असेही अॅड. रूपनवर म्हणाले.

... म्हणून मिळाली आमदारकी लोकसभा निवडणुकीपूर्वी कांग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रत्येक राज्यातील अंदाज वर्तवून घेतले. महाऱाष्ट्राच्या शिष्टमंडळात मी होतो. महाराष्ट्रात 30 ते 35 जागा कांग्रेसच्या येतील असा दावा सर्वच प्रमुख नेत्याने केला. मी मात्र म्हणाले, दोन किंवा तीन जागा येतील..सर्वजण माझ्यावर संतापले. जेंव्हा निकाल लागला तेंव्हा दोन जागा आल्या होत्या. सोनियांनी मला पुन्हा बोलावले आणि म्हणाल्या, या अभ्यासू कार्यकर्त्यांला आमदार करा आणि मी आमदार झालो, अशी आठवणही अॅड. रुपनवर यांनी सांगितली.

Web Title: congress mla advocate ramhari rupnawar political statement

टॅग्स

संबंधित बातम्या

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे दुष्काळी भागातील नागरीकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील.
पाणी, चारा नसल्याने जनावरांना कसे संभाळायचे? (व्हिडिओ)

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): साहेब, पिण्यासाठी पाणी नाही, चारा नसल्य़ाने जनावरांना कसे संभाळायचे यांची चिंता, दु्ष्काळी परीस्थीतीत हाताला काम मिळणे...

divyang
दिव्यागांनी मिळवला विकास निधीत वाटा

लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची...

तुर्काबादला किराणा दुकान फोडून 10 हजारांची चोरी

लिंबेजलगाव : तुर्काबाद खराडी (ता.गंगापुर, जि. औरंगाबाद ) येथे चोरट्यांनी किराणा दुकान फोडुन साहित्यासह 10 हजार रुपये चोल्याची घटना शनिवारी (ता.17)...

15 मुद्यांच्या आधारे सोलापुरातील झेडपी शाळांची तपासणी

सोलापूर- दिवाळीच्या सुटीनंतर यंदाच्या वर्षातील दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (ता. 19) सुरवात होत आहे. सुटीनंतरच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील...

लक्षद्वीपवर पुढील २४ तासांत वादळाची निर्मिती

मुंबई- तामिळनाडूत गज वादळाच्या तडाख्यानंतर नव्या वादळाचे संकेत मिळाले आहे. येत्या चोवीस तासांत लक्षद्वीपवर नवे वादळ तयार होत असल्याचा इशारा...