Sections

सोलापूर  - वंचितांच्या शाळेत आंबे खाण्याची स्पर्धा 

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 16 एप्रिल 2018
students

सोलापूर : आंबा... लहान-थोर साऱ्यांनाच आवडणारा. पाहताच क्षणी तोंडाला पाणी आणणारे हे फळ. रविवारी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने वंचितांच्या शाळेत आंबे खाण्याची स्पर्धा घेऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जोपासली. शाळेतील चिमुकल्यांनी आंब्यावर मस्त ताव मारून तृप्तीची ढेकर दिली. 

सोलापूर : आंबा... लहान-थोर साऱ्यांनाच आवडणारा. पाहताच क्षणी तोंडाला पाणी आणणारे हे फळ. रविवारी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने वंचितांच्या शाळेत आंबे खाण्याची स्पर्धा घेऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जोपासली. शाळेतील चिमुकल्यांनी आंब्यावर मस्त ताव मारून तृप्तीची ढेकर दिली. 

प्रार्थना फाउंडेशन संचलित वंचितांच्या शाळेतील 40 विद्यार्थ्यांनी या अभिनव स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धा जिंकण्याच्या चढाओढीने चिमुकल्यांनी आंब्यावर मस्त ताव मारला. लहान व मोठा गट अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना वह्या, कंपास, शालेय साहित्य बक्षीस स्वरूपात देण्यात आले. याप्रसंगी मागास सेवा मंडळाचे सचिव सुभाष चव्हाण, प्रतिष्ठानचे सल्लागार नितीन करवा, वंचितांच्या शाळेचे प्रमुख प्रसाद मोहिते, अनु मोहिते, श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट, प्रशांत हिबारे, कल्पना चव्हाण, साहेबराव परबत, शुभम हंचाटे, शुभम कासट, मल्लिकार्जुन आष्टगी, संजय गवडी आदी उपस्थित होते. मयूर गवते यांनी सूत्रसंचालन केले. मल्लिकार्जुन यणपे यांनी आभार मानले. 

मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. उपेक्षित, वंचित मुलांना आंबे खायला मिळत नाहीत. त्यांना आंब्याचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने अक्षय तृतीयेच्या निमित्ताने ही स्पर्धा घेतली. मुलांचा आनंद पाहून समाधान वाटले, असे मत श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांनी व्यक्त केले.

Web Title: competition of eating mango in solapur

टॅग्स

संबंधित बातम्या

मोहरमचा पंजा, भवानी मंदिर आणि शिवछत्रपतींचे तख्त

कोल्हापूर - मोहरमचा पंजा एखाद्या दर्ग्यात वाजत-गाजत गेला, पारंपरिक मार्गानेच त्याची मिरवणूक निघाली हे वातावरण सगळीकडेच आहे; पण मोहरमचा पंजा...

Competition for taking credit for Jaitane rural hospital
जैताणेत ग्रामीण रुग्णालयाबाबत श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरू!

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचे खरे श्रेय हे जैताणे ग्रामपंचायत व आरोग्य...

police.
पोलिस अधिकाऱ्यांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षण-लग्नापर्यंतचा खर्च

उल्हासनगर - नाशिक मधील आधारतीर्थ आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले मुली राहत असून, त्यापैकी एका मुलीला दत्तक घेऊन तिचे शिक्षण ते लग्न असा खर्च...

pali
सुधागडामध्ये वनविभागाकडून गावठी दारुभट्ट्या उध्वस्थ

पाली - बेकायदेशीर गावठी दारु निर्मीती व विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी सुधागड वनविभागाने कंबर कसली आहे. सुधागड वनक्षेत्रपाल समिर शिंदे यांच्या...

Shekhar-Gupta
‘उद्धटपणा’च्या रनवेवर ‘मूर्ख’पणाचं लॅण्डिंग (शेखर गुप्ता)

‘राफेल’ व्यवहार हा काही भ्रष्टाचार नाही. संरक्षण संसाधनांची खरेदी करताना सरकार किती डरपोक असतं हेच यातून दिसतं. सरकारच्या घाबरटपणामुळे हाती आलेल्या...