Sections

केडीसीसी बॅंकेचे चार कोटी रुपये जप्त

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 13 एप्रिल 2018

बेळगाव - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (केडीसीसी) चार कोटी रुपये गुरुवारी (ता. १२) दुपारी ४ वाजता बुगटे आलूर (ता. हुक्केरी) चेकपोस्टवर जप्त करण्यात आले. केडीसीसीच्या संचालक व अधिकाऱ्यांनी तातडीने चेकपोस्टवर जाऊन रक्‍कम परत देण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत रक्‍कम परत मिळाली नव्हती. 

बेळगाव - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (केडीसीसी) चार कोटी रुपये गुरुवारी (ता. १२) दुपारी ४ वाजता बुगटे आलूर (ता. हुक्केरी) चेकपोस्टवर जप्त करण्यात आले. केडीसीसीच्या संचालक व अधिकाऱ्यांनी तातडीने चेकपोस्टवर जाऊन रक्‍कम परत देण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत रक्‍कम परत मिळाली नव्हती. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, केडीसीसीच्या गडहिंग्लज शाखेचे कर्मचारी पैसे आणण्यासाठी कोल्हापूरच्या मुख्य शाखेत गेले होते. गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीन तालुक्‍यांतील बटवड्यासाठी ही रक्‍कम कोल्हापूरच्या मुख्य शाखेतून गडहिंग्लजला नेण्यात येत होती. चार कोटी रुपये घेऊन गडहिंग्लजला परत येताना बुगटे आलूर चेकपोस्टवर अधिकाऱ्यांनी ते जप्त केले. कर्मचाऱ्यांनी या संदर्भात माहिती मुख्य शाखेला दिली. त्यावर मुख्य शाखेतील कोषागार श्री. जाधव, बॅंकेचे संचालक संतोष पाटील, विकास अधिकारी रणनवरे, निरीक्षक वाळके तातडीने बुगटे आलूरला गेले. त्यांनी ४ कोटी रुपयांसंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर केली.

प्राप्तिकर खात्याचे अधिकारीही तिथे आले. त्यांनीही त्या पैशासंदर्भात सविस्तर चौकशी केली. चेकपोस्टवरील अधिकारी तसेच प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी केडीसीसीच्या मुख्य शाखेशी संपर्क साधून पैसे बटवड्यासाठी नेले जात असल्याची खात्री करून घेतली. तरीही अधिकाऱ्यांनी पैसे परत दिले नाहीत. संचालक श्री. पाटील व बॅंकेचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत तेथे थांबून अधिकाऱ्यांशी चर्चा करीत होते; पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांच्या ताठर व असहकार्याच्या भूमिकेबद्दल केडीसीसीच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Belgaum News KDCC four crore of bank seized

टॅग्स

संबंधित बातम्या

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटला; सीबीआयला 45 दिवसांची मुदतवाढ

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्यावर दाखल झालेल्या...

dr shruti panse
मिळून सारेजण (डॉ. श्रुती पानसे)

मुलांसकट नवनवे अनुभव घेणं, त्यासाठी स्वतःला आणि पूर्ण कुटुंबाला सतत संपन्न करत राहणं, समृद्ध करत राहणं हा एक वेगळाच प्रवास असतो. मुलांसह समृद्ध...

samir abhyankar
गाण्यात इतरांची नक्कल नको (समीर अभ्यंकर)

शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी...

sukrut deo
डिजिटल स्वाक्षरी (ऍड. सुकृत देव)

गुंतवणुकीशी आणि आर्थिक बाबींशी संबंधित व्यवहारांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) हा त्याचा एक...

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28...

divyang
दिव्यागांनी मिळवला विकास निधीत वाटा

लातूर : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकास निधीपैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे सरकारचे आदेश आहे. मात्र, या आदेशाची...