Sections

बार्शी तालुका पोलिस ठाणे उद्यापासून होणार सुरू

सुदर्शन हांडे |   सोमवार, 30 एप्रिल 2018
police

बार्शी तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत या गावांचा समावेश......
पांगरी पोलिस ठाण्याचे हद्दीतील शेलगाव (मा), जामगाव (आ), भोयरे, ताडसौदणे, वानेवाडी, शेलगाव (व्हळे), गाडेगाव, कांदलगाव, खडकलगाव, मांडेगाव, बेलगाव, उंबरगे, बावी(आ), तावडी, आरनगाव, बाभुळगाव, आगळगाव, कुसळंब, धोत्रे, बोरगाव, चारे, चुंब, धामनगाव, धानोरे, कोरेगाव, पाथरी, खडकोणी, धनगरवाडी, भानसळे, देवगाव(मा), पिंपळगाव (धस), काटेगाव ही गावे तर वैराग व बार्शी शहर पोलिस ठाण्याचे हद्दीतील खांडवी, अलिपुर, शेंद्री, गाताचीवाडी, उपळाई ठोंगे, वांगरवाडी, कासारवाडी, बळेवाडी, कव्हे, कोरफळे, दडसिंगे, सौदरे, फपाळवाडी, लक्ष्याची वाडी, तावरवाडी, भोईंजे, श्रीपतपिंपरी, गोडसेवाडी, कोरफळे, मालवंडी, गुळपोळी, तुर्क पिंपरी, सुर्डी, उंडेगाव, रस्तापुर, पानगाव, नागोबाची वाडी या गावांचा नव्याने स्थापन होणा-या पोलिस ठाण्यात समावेश होणार आहे.

बार्शी : मागील अनेक वर्ष पासून मागणे असलेले व मंजुरी मिळून ही उद्गघटनाच्या प्रतीक्षेत असलेले बार्शी तालुका पोलिस ठाणे अखेर १ मे पासून सुरू होणार आहे. बार्शी शहराच्या कडेने असलेल्या गावातील लोकांची हेळसांड बंद होणार असून पोलिसांवरील कामाचा ताणही हलका होणार आहे. 

बार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या शुभारंभ मंगळवारी महाराष्ट्र दिनी होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून बार्शी शहराच्या जवळपास असलेल्या ग्रामीण भागातील लोकांची सोया व्हावी म्हणून या नव्या पोलीस स्टेशनची मागणी करण्यात येत होती. सध्या बार्शी तालुक्यात वैराग पोलीस स्टेशन, पांगरी पोलीस स्टेशन व बार्शी शहर पोलीस स्टेशन कार्यरत आहे. बार्शी तालुक्यात १३८ गाव असून यातील उत्तर बार्शी तालुक्यातील सर्व गाव पांगरी पोलीस स्टेशनला तर दक्षिण बार्शी तालुक्यातील गाव वैराग पोलीस स्टेशन ला जोडलेली होती. या मुळे एखाद्या गावात काही वाद-भांडण झाले अथवा पोलीस स्टेशन मधील इतर कामसाठी बार्शी शहरापासून जवळ असल्या गावांना बार्शी वरून संमधीत पोलीस स्टेशनला जावं लागत असे. पोलिसांची तात्काळ मदत लागत असताना लांबच्या अंतरामुळे वेळेत मदत पोहोचवणे अवघड होतं असे. त्यामुळे नव्या बार्शी तालुका पोलीस स्टेशनची मागणी होती. 

बार्शी शहरातील जुन्या शहर पोलिस ठाण्याच्या ईमारतीमध्ये नुतन पोलिस ठाणे होत आहे. पोलिस ठाण्यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दोन दिवसा पासून नव्या पोलीस स्टेशनचे त्यांच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. कागदोपत्री कामकाज १ मे पासून सूरी होणार आहे. याचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते, जिल्हा पोलिस प्रमुख विरेश प्रभु यांच्यासह ईतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. 

नुतन तालुका पोलिस ठाण्यासाठी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, ९ एएसआय,१६ हवालदार,१६ नाईक व २१ पोलिस शिपाई अशी अधिकारी व कर्मचारी मिळून ६५ कर्मचारी संख्या निश्चित करण्यात आली आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी, वैराग व बार्शी शहर पोलिस ठाण्याचे हद्दीतील गावांची विभागणी करून नव्याने तालुका पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. नुतन बार्शी तालुका पोलिस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे यांच्या कार्यकाळात होत असून पहिले अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र खांडेकर व पोलिस उपनिरीक्षक म्हणून ज्ञानेश्वर बेंद्रे यांना कामकाज पहाण्याची संधी मिळाली आहे.

बार्शी तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत या गावांचा समावेश...... पांगरी पोलिस ठाण्याचे हद्दीतील शेलगाव (मा), जामगाव (आ), भोयरे, ताडसौदणे, वानेवाडी, शेलगाव (व्हळे), गाडेगाव, कांदलगाव, खडकलगाव, मांडेगाव, बेलगाव, उंबरगे, बावी(आ), तावडी, आरनगाव, बाभुळगाव, आगळगाव, कुसळंब, धोत्रे, बोरगाव, चारे, चुंब, धामनगाव, धानोरे, कोरेगाव, पाथरी, खडकोणी, धनगरवाडी, भानसळे, देवगाव(मा), पिंपळगाव (धस), काटेगाव ही गावे तर वैराग व बार्शी शहर पोलिस ठाण्याचे हद्दीतील खांडवी, अलिपुर, शेंद्री, गाताचीवाडी, उपळाई ठोंगे, वांगरवाडी, कासारवाडी, बळेवाडी, कव्हे, कोरफळे, दडसिंगे, सौदरे, फपाळवाडी, लक्ष्याची वाडी, तावरवाडी, भोईंजे, श्रीपतपिंपरी, गोडसेवाडी, कोरफळे, मालवंडी, गुळपोळी, तुर्क पिंपरी, सुर्डी, उंडेगाव, रस्तापुर, पानगाव, नागोबाची वाडी या गावांचा नव्याने स्थापन होणा-या पोलिस ठाण्यात समावेश होणार आहे.

Web Title: Barshi Taluka police station starts

टॅग्स

संबंधित बातम्या

File photo
युवतीचा युवकावर चाकूने हल्ला

नागभीड (जि. चंद्रपूर) : येथील विश्रामगृहासमोर एका विवाहित पुरुषावर युवतीने चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना सोमवारी (ता. 17) रात्री 8.30 वाजताच्या...

Return the bag of gold bangles received because of CCTV
'सीसीटीव्ही'मुळे मिळाली सोन्याच्या बांगड्या असलेली बॅग परत

नाशिक : गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक असा प्रवास करताना वयोवृद्ध महिला रिक्षामध्येच बॅग विसरल्या. त्या बॅगेत साडेसहा तोळ्याच्या 1 लाख 92 हजार...

पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना युवा क्रीडा पुरस्कार

कराड : तीन वेळा महाराष्ट्र केसरी असलेल्या पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना यंदाचा युवा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. माजी...

Ganesh Aarti On Set Of Sur Nava Dhyas Nava Singing Program On Colors Marathi Channel
'सूर नवा ध्यास नवा'मध्ये छोट्या सुरवीरांनी केली गणरायाची स्थापना

चौसष्ट कलेची देवता अशी ओळख असलेला लाडका गणराया लहान मुलांचा सर्वात आवडता देव. गणरायांच्या आगमनाचे या बालमित्रांना कायमच वेध लागलेले असतात. अनेकांसाठी...

Two Arrested in Uttarakhand For Chatting About Killing Defence Minister Nirmala Sitharaman in Dehradun
संरक्षणमंत्र्यांच्या हत्येचा कट ? ; दोघांना अटक

देहरादून : देशाचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येचा कट रचण्याबाबत व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. निर्मला...