Sections

महात्मा बसवेश्वर स्मारकाबाबतच्या हालचाली संथगतीने

हुकूम मुलाणी |   गुरुवार, 19 एप्रिल 2018
mahatma basweshwar

मंगळवेढा (सोलापूर): संताच्या भूमीतून महात्मा बसवेश्वरांनी जगाला समतेचा संदेश दिला. त्यांच कर्मभुमीत स्मारक उभारणी करण्याची घोषणा करुन समितीही स्थापन केली, स्मारकासाठी तरतुद केलेला निधी पडून असून वारंवार बैठका होत असल्याने तरी स्मारकाबाबतच्या हालचाली संथगतीने सुरु आहेत.

मंगळवेढा (सोलापूर): संताच्या भूमीतून महात्मा बसवेश्वरांनी जगाला समतेचा संदेश दिला. त्यांच कर्मभुमीत स्मारक उभारणी करण्याची घोषणा करुन समितीही स्थापन केली, स्मारकासाठी तरतुद केलेला निधी पडून असून वारंवार बैठका होत असल्याने तरी स्मारकाबाबतच्या हालचाली संथगतीने सुरु आहेत.

निर्गुण निराकार एकेश्वर वादीचे श्रध्देचा पुरस्कार करणाऱया महात्मा बसवेश्‍वर यांनी 12 व्या शतकात समाज प्रबोधनाचे काम केले. बिदरवरुन मंगळवेढयात वास्तव्य केलेल्या महात्मा बसवेश्वराची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढयात स्मारक व्हावे याची मागणी बसवप्रेमीची मागणी बय्राच वर्षापासून होती. आ भारत भालके यांनीही आघाडी सरकारच्या काळात प्रयत्न केले पण जागेच्या कारणावरुन हा प्रश्न प्रलंबित राहिला.

राज्यातील सत्ता बदलानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंगळवेढा दौय्रात स्मारकाच्या मागणीचा जोर धरल्यावर 20 मार्च रोजी शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षस्थेतेखाली 24 सदस्यांचा समावेश करत समितीची निवडीचा निर्णय जाहीर केला या समितीमध्ये आ. भारत भालके, आ.दिलीप सोपल, आ प्रशांत परिचारक, आ हरिष पिंपळे, माजी आमदार मनोहर पटवारी, काकासाहेब कोयटे, गुरुनाथ बडूरे, ऍड शैलेश हावनाळे, उदय चौंडे, गंगाधर पटणे,नगराध्यक्ष अरुणा माळी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा पोलीस अधिक्षक, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम, कार्यकारी अभियंता जि.प., तहसीलदार, सवर्धक सहायक भारतीय पुरातत्व सर्वेक्षक विभाग, जिल्हास्थरीय पुराभिलेख अधिकारी, वास्तुशास्त्र सार्वजनिक बांधकाम विभाग, कला संचालक मुंबई, सहायक संचालक नगररचना विभाग, व स्मारकाशी संबधित संस्थेचे अध्यक्ष यांचा समावेश केला.

कृषी खात्याच्या मालकीची असलेल्या 65 एकर जमीनीपैकी 25 एकर जमीन स्मारकासाठी दयावी आणि महसूल खात्याच्या अखत्यारित असलेल्या जमीनीमधील 25 एकर जमीन त्या बदल्यात दयावी अशी मागणी आहे यासाठी 6 कोटीचा निधी राखीव असून समितीची नियुक्ती झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या स्मारकाच्या कामाला गती येण्याची आशा होती याबाबत नऊ एप्रिल 17 रोजी पहिली बैठक झाली कृषी विभागाची 25 एकर जमीन महात्मा बसवेश्वराच्या स्मारकासाठी हस्तांतरीत करण्यासाठी जिल्हाधिका-यांना आदेश दिले आहेत. कृषी मंत्री फुंडकर, यांच्याशी कृषी विभागाच्या जागेबाबत चर्चा केली त्यानंतर जिल्हाधिका-यामार्फत या जागेचा प्रस्ताव शासनदरबारी पाठवण्यात आल्याचे कृषी खात्याच्या अधिकाय्रानी सांगितले. त्यानंतर स्मारक समितीतील सदस्यांच्या कोल्हापूर बैठकीत नियोजित स्मारकाचा आराखडा  तयार करणे त्यामध्ये अनुभव मंडप, बसवेश्वर सृष्टी, ग्रंथालय, निवास, भोजन व्यवस्था, पार्कीग, दवाखाना, शुध्द पाणी याशिवाय आणखीन नवीन काय करता येते का यावर चर्चा केली. एकूणात स्मारकाच्या बाबतीत मागील सत्ताधाऱयांनी चालढकल केली. विद्यमान सरकारच्या वर्षभरापासून हालचाली संथगतीने सुरु असल्यामुळे आ. भालके यांनी लक्षवेधी व्दारे आवाज विधानसभेत उठविला असला तरी यास तातडीने गती दयावी, अशी मागणी बसवप्रेमीनी केली

स्मारक समितीचे अध्यक्ष पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गतवर्षी जयंती सोहळयातील उदघाटन प्रसंगी बोलताना स्मारकाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले पण वर्ष झाले तरी बैठका व आराखडा तयार करून सादर करण्यातच वेळ गेला. या स्मारकासाठी तयार केलेला आराखडा येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांकडे सादर होणार असून अंदाजे 99 कोटीच्या या आराखड्याला मंजुरी कधी मिळणार असा सवाल बसवप्रेमी नागरिकातून विचारला जात आहे.

Web Title: The activities of Mahatma Basaveshwar Memorial were slow

टॅग्स

संबंधित बातम्या

Police-Bribe
सलग दुसऱ्या दिवशी पोलिस लाचेच्या जाळ्यात

औरंगाबाद - सातारा पोलिस ठाण्याचा सहायक फौजदार लाचेच्या सापळ्यात अडकल्यानंतर सिटी चौक ठाण्याच्या पोलिस नाईकाला अडीच हजारांची लाच घेताना पकडले. वाळू...

राहुरीमध्ये वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

राहुरी - राहुरी येथे काल (मंगळवारी) रात्री दहा वाजता, नगर-मनमाड महामार्ग ओलांडताना एक ते दीड वर्षाच्या नर बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक...

आता ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी

चंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्या पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव...

गोंदिया - अनाथ मुलामुलींसह उपस्थित मान्यवर.
आईवडिलांचे छत्र हिरावलेल्यांना कपडे वाटप

गोंदिया - वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही....

बोराटी येथील घटनास्थळाची पाहणी करताना समिती सदस्य.
‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी सुरू

यवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता...

Property-Tax
पाच महिन्यांत २३६ कोटींचे आव्हान

नागपूर - महापालिकेचे प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता करातून गेल्या सात महिन्यांत केवळ १०२ कोटी रुपये वसूल करण्यात आले. स्थायी समितीने या वर्षात...