Sections

शेतकऱ्याकडून अडीच हजारांची लाच घेणाऱ्या लेखापाल, प्रतवारीकारास अटक 

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 29 मार्च 2018
Accountant arrested for taking bribe from the farmer

अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल राजशेखर श्रीमंत मुळे, नाफेड प्रतवारीकार विनायक अंबादास जाधव अशी आरोपींची नावे आहेत. 

सोलापूर - वखार महामंडळांनी नाकारलेली तूर चाळणी केल्यानंतर परत घेण्यासाठी शेतकऱ्याकडून अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल आणि नाफेड प्रतवारीकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली. 

अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लेखापाल राजशेखर श्रीमंत मुळे (वय 55, सोलापूर. रा. आदर्श नगर, मार्केटयार्ड जवळ, अक्कलकोट) नाफेड प्रतवारीकार विनायक अंबादास जाधव (वय 29, रा. मु.पो. किणी, ता. अक्कलकोट) अशी आरोपींची नावे आहेत. 

तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी दि. 26 मार्च 2018 रोजी 64 पाकिटे अक्कलकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तूर शासनाचे हमीभाव केंद्रात विक्रीसाठी दिली होती. वखार महामंडळ, अक्कलकोट यांनी तक्रारदार शेतकऱ्याची 31 पाकीट तूर खराब असल्याचे सांगून परत पाठवली. ती 31 पाकिटे तूर चाळणी करुन परत वखार महामंडळ, अक्कलकोट येथे पाठवून जमा करुन घेण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडून लेखापाल राजशेखर मुळे याने दोन हजार पाचशे रुपये लाचेची मागणी केली. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला. लाचेची रक्कम प्रतवारीकार जाधव याने स्विकारली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अक्कलकोट पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Accountant arrested for taking bribe from the farmer

टॅग्स

संबंधित बातम्या

शेअर बाजार पुन्हा गडगडला

मुंबई: शेअर बाजारात आज (सोमवार) पुन्हा मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 546 अंशांची घसरण नोंदवण्यात आली....

aurangabad
64 व्या कृषी संशोधन समितीच्या बैठकीस सुरवात

औरंगाबाद - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या (रब्बी हंगाम) 64 वी बैठकीस (झेड आरइएसी,...

mohol
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ जागरण गोंधळ

मोहोळ (सोलापूर) : सततच्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात हैराण झालेल्या जनतेच्या वतीने मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसने ...

मिरजमध्ये अद्याप विसर्जन मिरवणूक सुरू

मिरज - शहरातील अनंतचतुर्थीची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. शेवटच्या गणपतीचे विसर्जन होण्यास दुपारचे तीन वाजतील असा पोलिसांचा अंदाज आहे....

wagholi
वाघोलीत गणरायाला जल्लोषात निरोप

वाघोली : वाघोलीत जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात हिंदी, मराठी गाण्यावर ठेका धरत "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या", च्या जयघोषात...