Sections

जिल्ह्यातील 76 शेतकऱ्यांना विमासंरक्षण 

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 27 एप्रिल 2018
Farmer

काशीळ - गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मार्चअखेर जिल्ह्यातील ७६ शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळाला. गेल्या नऊ वर्षांत जिल्ह्यातील एक हजार १८३ शेतकऱ्यांना या योजनेतून विमा संरक्षणाचा लाभ मिळाला आहे.

काशीळ - गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मार्चअखेर जिल्ह्यातील ७६ शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळाला. गेल्या नऊ वर्षांत जिल्ह्यातील एक हजार १८३ शेतकऱ्यांना या योजनेतून विमा संरक्षणाचा लाभ मिळाला आहे.

शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातात दोन्ही डोळे, दोन्ही हात निकामी किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. नोव्हेंबर २०१५ मध्ये शेतकरी अपघात विमा योजनेला ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ असे नाव देण्यात आले. या योजनेत डिसेंबर २०१५ पासून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना दुप्पट म्हणजे दोन लाख रुपयांचे विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. शेतात दैनंदिन कामे करताना शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अपघात होतात. अनेकदा विषारी प्राण्यांचा दंश, वीज पडणे, विजेचा धक्‍का लागणे, रस्ते अपघात या घटनांमध्ये शेतकऱ्यांचे मृत्यू होतात.

अपघातात घरातील कर्ती व्यक्‍ती गमावलेल्या शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी शेतकरी जनता अपघात विमा योजनेतून संरक्षण देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत मार्चअखेर जिल्ह्यात १६४ प्रस्ताव विमा कंपनीस सादर करण्यात आले होते. त्यापैकी ७६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, तीन प्रस्ताव नामंजूर, तर ८५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. शेतकरी अपघात विमा योजना सुरू असली तरी या योजनेबद्दलची माहिती नसल्यामुळे शेतकरी वर्ग या मदतीपासून वंचित राहण्याची शक्‍यता असते. त्यामुळे कृषी विभागाकडून या योजनेतून जास्तीत जास्त मदत व्हावी, यासाठी दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रस्ताव जमा केले जात आहेत.

...ही आहे सद्य:स्थिती विमा कंपनीस प्रस्ताव सादर - 164 मंजूर प्रस्ताव - 76 नामंजूर प्रस्ताव - 03 प्रलंबित प्रस्ताव - 25

Web Title: 76 farmer insurance security

टॅग्स

संबंधित बातम्या

शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर उरकावे

भिलार : महाबळेश्वर तालुक्यातील महसूल विभागाने शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर उरकावे आणि तोपर्यंत शिधापत्रिका धारकांना रेशन देण्याची...

सहकारामध्ये मनाला वाट्टेल तशी लुडबुड सरकारने करू नये : दिलीप माने

मोहोळ: सहकाराबद्धल कायद्यात पुर्ण तरतुद असताना सरकारने त्यामध्ये मनाला वाट्टेल तसा अर्थ काढुन सहकारमध्ये लुडबुड करू नये असे स्पष्ट मत...

crime
मुलीचे अपहरण करून बलात्कार; मुलगी सात महिन्याची गर्भवती

सदर-  मैत्रिणीच्या घरी पायी जाणाऱ्या 17 वर्षीय मुलीला सहा महिन्यांपूर्वी एका युवकाने बेशुद्ध करून अपहरण केले. तिच्यावर रस्त्याच्या कडेला झुडूपात...

मटणाच्या रस्स्यात पडून बालिकेचा मृत्यू

माडग्याळ : सांगली जिल्ह्यातील संख (ता. जत) येथील साक्षी योगेश कांबळे (वय 4) ही मुलगी मटणाच्या रस्याच्या पातेल्यामध्ये पडून गंभीर भाजली. मिरज येथील...

accident
गॅस कंटेनरच्या धडकेत चालकाचा मृत्यू 

कजगाव : भोरटेक (ता. भडगाव) जवळील तिहेरी वाहन अपघातात कंटेनरच्या धडकेने पिकअप चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली.रसत्याचे...