Sections

खंबाटकी घाटात भीषण अपघात; 17 जण ठार

अशफाक पटेल |   मंगळवार, 10 एप्रिल 2018
accident

मृतांमधील सर्वजण मदभावी तांडा नं. 1 (विजापुर) येथील रहिवाशी होते. सेंट्रींग व कॉक्रीटीकरणाच्या कामासाठी ते पुण्याकडे येत होते. हा अपघात इतका भयानक होता की मृतदेहांचे तुकडे झाले होते. अपघातानंतर पोलिस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

खंडाळा : पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी घाटात आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास पुण्याकडे मजूरांना घेऊन येणारा टेम्पो एस वळणावर पलटी घेऊन झालेल्या भीषण अपघातात 17 जण ठार झाले असून, 15 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खंबाटकी घाटात पुण्याकडे येत असताना एस वळणावर हा अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने आयशर टेम्पो (केए 37 6037) थेट दरीत कोसळला. या अपघातात 17 जण जागीच ठार झाले. यात तीन लहान मुलांचा व सहा महिन्याच्या बाळाचा समावेश होता. टेम्पोत एकूण 35 जण होते. जखमींना शिरवळ, खंडाळा व स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. टेम्पो चालकाला झोप न आवरल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

मृतांमधील सर्वजण मदभावी तांडा नं. 1 (विजापुर) येथील रहिवाशी होते. सेंट्रींग व कॉक्रीटीकरणाच्या कामासाठी ते पुण्याकडे येत होते. हा अपघात इतका भयानक होता की मृतदेहांचे तुकडे झाले होते. अपघातानंतर पोलिस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या एस वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. मात्र, प्रशासनाकडून याकरिता अद्याप काहीही करण्यात आलेले नाही.

Web Title: 17 dead in accident khambatki ghat on Pune-Bangalore highway

टॅग्स

संबंधित बातम्या

ताडकळस - बालाजी रुद्रवार मारहाणी प्रकरणी येथील बाजारपेठ बंद

ताडकळस - शिवसेनेच्या पक्षाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी ता.23 सप्टेंबर रोजी परभणी येथे बोलावून ताडकळस ता.पुर्णाचे शहराध्यक्ष बालाजी रुद्रवार...

Pune City Police Commissioner
मेरे पुलिस दोपहर का लंच अपने घर करेंगे : पुण्याचे पोलिस आयुक्त 

पुणे : 'मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे' अशा शब्दांत पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश यांनी पोलिसांच्या कामगिरीचे आज (सोमवार)...

पिंपळे गुरव - श्री छत्रपती मित्र मंडळाने बालाजी महालक्ष्मी रथात त्यांचे गणपती बाप्पा बसवून विसर्जन मिरवनूक पार पाडली.
पिंपळे गुरव परिसरात डीजेचे पोलिसांकडून विसर्जन...

नवी सांगवी ( पुणे ) - डिजेचा थयथयाट नसल्यामुळे यंदा पिंपळे गुरवची विसर्जन मिरवणूक वैशिष्ठपुर्ण ठरली. डीजे अभावी गणेश मंडळांच्या अतिउत्साही...

Representational Image
इम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का? (सुधीर काळे)

  पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...

crime
डहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक

बोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...