Sections

सातारा जिल्ह्यात 103 कोटींचा महसूल जमा

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 28 एप्रिल 2018

सातारा - जिल्ह्यातील वाळूउपशाला गत आर्थिक वर्षात परवानगी मिळाली नसतानाही महसूल वसुलीत जिल्ह्याने १०३ कोटींवर मजल मारली आहे. गौणखनिज विभागाला १०० कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट होते. परंतु, वाळू लिलाव न झाल्याने ते ५० कोटी इतकेच झाले. 

सातारा - जिल्ह्यातील वाळूउपशाला गत आर्थिक वर्षात परवानगी मिळाली नसतानाही महसूल वसुलीत जिल्ह्याने १०३ कोटींवर मजल मारली आहे. गौणखनिज विभागाला १०० कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट होते. परंतु, वाळू लिलाव न झाल्याने ते ५० कोटी इतकेच झाले. 

गत आर्थिक वर्षात जिल्हा प्रशासनाला ११० कोटींचे महसूल प्राप्तीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी महसूल विभागाने १०३ कोटी ८० लाखांचा महसूल वसूल केला. गत वर्षात ६४ वाळू लिलाव काढले गेले. मात्र, हरित लवादाने राज्यभरातील वाळू उपशांवर बंदी घातल्याने हे लिलाव होऊ शकले नाहीत. त्यापूर्वी २०१६-१७ मध्ये वाळू लिलावातून १८ कोटींचा महसूल मिळाला होता. जुन्या भूसंपादन कायद्यानुसार दहा कोटी व इतर करांतून सुमारे ४८ कोटींचा महसूल जमा झाला होता. 

अवैध गौणखनिज उत्खननाच्या १०७ प्रकरणांतून ८९ लाख, ७९१ अवैध वाहतुकीवर कारवाईतून चार कोटी ४९ लाखांचा महसूल जमा झाला. या विभागाने ५० गुन्हेही दाखल केले. जिल्हा खनिज प्रतिष्ठानांतर्गत नियामक समितीने मिळालेल्या निधीतून सातारा, जावळी, कऱ्हाड तालुक्‍यास प्रत्येकी २० लाख, कोरेगाव- ३० लाख, पाटण तालुक्‍यास दहा लाख असा एक कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या कामासाठी दिला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे यांनी दिली. 

सातारा ते पंढरपूर, कऱ्हाड ते चिपळूण या रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सातारा-पंढरपूर मार्गातून सुमारे साडेचार कोटी, कऱ्हाड-चिपळूण रस्त्यातून सुमारे साडेतीन कोटी तसेच रेल्वे ट्रॅक दुपरीकरणातून अडीच कोटींचा महसुलास हातभार लागला.

महसूल वसुली (2017-18) जमीन महसूल - 30.80 कोटी करमणूक कर - 14.03 कोटी गौणखनिज उत्खनन - 50.45 कोटी

Web Title: 103 crore revenue collect in satara district

टॅग्स

संबंधित बातम्या

डेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट

पुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...

चाऱ्यासाठी पैसे नाहीच - चंद्रकांत पाटील

मुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि...

पिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस

पिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही...

पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील...

जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी

जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...

File photo
भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार

भारत-ऑस्ट्रेलिया "वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...