Sections

इको-फ्रेंडली गणेशमूर्तींचा अमेरिकेत ‘कोल्हापुरी जागर’

सुधाकर काशीद |   बुधवार, 12 सप्टेंबर 2018

कोल्हापूर - गणेश चतुर्थी दोन दिवसांवर आहे. गणेशमूर्तीचे स्टॉल कुंभार गल्लीत आणि इतर ठिकाणी लागले आहेत. महाराष्ट्रभर तर गणेशोत्सवाची धामधूम आहेच; पण चक्क अमेरिकेतील न्यूजर्सी येथे मूळ कोल्हापूरच्या शीतल प्रसाद बागेवाडी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा स्टॉल उभा केला आहे.

कोल्हापूर - गणेश चतुर्थी दोन दिवसांवर आहे. गणेशमूर्तीचे स्टॉल कुंभार गल्लीत आणि इतर ठिकाणी लागले आहेत. महाराष्ट्रभर तर गणेशोत्सवाची धामधूम आहेच; पण चक्क अमेरिकेतील न्यूजर्सी येथे मूळ कोल्हापूरच्या शीतल प्रसाद बागेवाडी यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा स्टॉल उभा केला आहे.

नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने काही महाराष्ट्रीयन अमेरिकेत राहत असले; तरी भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ ते या ना त्या पद्धतीने जपत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून शीतल यांनी स्वतः गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. दोन वर्षांचा अनुभव पाहता न्यू जर्सीच्या आसपास शंभर-दोनशे किलोमीटर परिसरात राहणारे सुमारे ४० भारतीय या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घेऊन जाणार आहेत. 

मूर्ती तयार करताना शीतल यांनी अमेरिकेतील पर्यावरणाचे सर्व निकष पाळले आहेत. मूर्ती विरघळणाऱ्या आहेत आणि रंग रासायनिक नाहीत, याची खबरदारी घेतली आहे. तेथील विसर्जनाची पद्धत सार्वजनिक पाणीसाठ्याऐवजी बागेत, पाण्याच्या बादलीत विसर्जन करण्याची आहे. सर्व मूर्ती एक ते दोन फूट उंचीच्या व बैठ्या सिंहासनावरील आहेत. 

शीतल येथील प्रतिभानगर परिसरातील रेड्याच्या टकरीजवळ राहणाऱ्या. शरद व सुलभा देशपांडे यांच्या त्या कन्या. चित्रकला व शिल्पकलेची त्यांना मुळातच आवड. येथील शिवाजी विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी आणि दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी कलेचे शिक्षण घेतले. विवाहानंतर पती प्रसाद यांच्यासोबत त्या अमेरिकेत गेल्या. पहिले वर्ष त्या गणेशोत्सवात अस्वस्थ राहिल्या. आपण गणेशोत्सवाच्या आनंदाला मुकलो, याची चुटपूट त्यांना लागली. त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःच गणेशमूर्ती तयार केली आणि तिची प्रतिष्ठापना केली. 

रोज सकाळी-संध्याकाळी शेजारच्या दोन-तीन कुटुंबांतील लोकांना सोबत घेऊन तालासुरात आरतीही होऊ लागली. गेल्या वर्षी त्यांनी स्वतःसाठी आणि इतर परिचितांसाठी मूर्ती तयार केल्या. साधारणपणे २० ते २५ भारतीयांनी या मूर्ती नेऊन गणेशोत्सवाचा आनंद घेतला. यंदा त्यांनी तीस ते पस्तीस सुबक मूर्ती तयार केल्या आहेत. महिनाभर त्यांचे हे काम घरातल्या घरात चालू आहे. आता त्यांच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. अंगणातच त्यांनी हा स्टॉल मांडला आहे. नुसत्या मूर्तीच नव्हे; तर खीर, मोदक, करंज्यांसाठी लागणारे सर्व साहित्यही आणले आहे. गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे एक वेगळ्या आनंदाची अनुभूती असते. त्यामुळे अमेरिकेत राहत असलो; तरी आपल्या परीने या सणाचा आनंद घेण्यासाठी त्यांची धडपड आहे. 

गणेशोत्सवासारखा आनंदी सोहळा व धमाल दुसऱ्या सणात नाही. कोल्हापुरात लहानपणापासून गणेशोत्सवात मी सहभागी होत राहिले. मूर्तीची प्रतिष्ठापना, आरास, विसर्जनाची धमाल यात सहभागी झाले. आता मी काही काळ भारतापासून दूर आहे; पण माझ्या परीने केवळ माझ्यासाठी नव्हे, तर इथल्या इतर भारतीयांनाही या सणाचा आनंद घेता यावा, यासाठी मूर्ती तयार केल्या आहेत.  - शीतल बागेवाडी

Web Title: eco friendly Ganesh Festival in America

टॅग्स

संबंधित बातम्या

बाळासाहेब खोटे बोलतात : गुलाबराव गावंडे

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब...

दुष्काळातही शेतकरी आशावादी ; ज्वारीची पेरणी सुरू

करमाळा : करमाळा तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे. खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली. काहीही खरीप हाती लागले नाही. तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी...

''जळगाव-सोलापूर लोहमार्ग व्हावा''

बीड : महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांतील अनेक जिल्ह्यांत भौतिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी...

Sharad Pawars Solve Wrestling between two Marathi channels
शरद पवारांनी सोडविली दोन वाहिन्यांमधील 'कुस्ती'

पुणे- कुस्ती स्पर्धा भरविण्यावरुन दोन मराठी वाहिन्यांमध्ये सुरु असलेल्या वादावर शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. या दोन्ही वाहिन्यांनी कुस्तीगीर...

बीडमध्ये घर परवान्यावर शाळा बांधकाम ; गुन्हा दाखल

बीड : नगर पालिकेकडून घराच्या बांधकामाचा परवाना घेऊन शहरातील अजिजपुरा भागात शाळेचे बांधकाम केल्याचे स्वच्छता विभागाच्या पाहणीत समोर आले आहे....