Sections

लिविंग्स्टनमध्ये वाढतेय क्रिकेटची लोकप्रियता

निलेश म्हात्रे |   मंगळवार, 8 मे 2018
livingston

सध्या लिविंग्स्टन मध्ये क्रिकेटची लोकप्रियता सातत्याने वाढते आहे, क्रिकेटची जादू सर्वांच्या डोक्यावर स्वार झालेली आहे. 

2006 सालापासून अमेरिकेत लिविंग्स्टन, न्यू जर्सी येथे काही मोजक्या भारतीयांनी क्रिकेट खेळायला सुरूवात केली, तेव्हा समोर बरीच आव्हाने होती. त्यापैकी एक म्हणजे खेळण्यासाठी हक्काचे मैदान. अमेरिकेतील लोकप्रिय खेळांसाठी मैदाने आहेत जिथे कही ठराविक दिवशी ठराविक खेळ खेळले जातात, परंतु क्रिकेटसाठी पीचसहित मैदान उपलब्ध होणे गरजेचे होते. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटप्रेमी निलेश म्हात्रे, मिलिंद सप्रे व त्यांचा मित्रपरिवार यांची जिद्द, अथक प्रयत्न व संस्कृति संस्थेचा पाठिंबा यामुळे ही कल्पना 22 एप्रिल 2018 रोजी साकार झाली. 

लिविंग्स्टन टाउनशिपतर्फे 'लिविंग्स्टन क्रिकेट एसोसिएशन' स्थापन करण्यात आले आणि 22 एप्रिल 2018 हा दिवस 'क्रिकेट दिन ' म्हणुन मानपत्र देऊन जाहिर करण्यात आला. यापुढे लिविंग्स्टनमधे 22 एप्रिल हा दिवस ‘क्रिकेट दिन’ म्हणून ओळखला जाईल. लिविंग्स्टन मधील रायकर हिल या शाळेचे मैदान क्रिकेटसाठी शनिवार-रविवारी आरक्षित करण्याचे जाहिर करण्यात आले. या दिवशी लिविंग्स्टनच्या माननीय मेयरने स्वतः मैदानवार उपस्थित राहून गोलंदाजी (बोलिंग) आणि फलंदाजी (बॅटिंग) केली. लिविंग्स्टन टाउनशिपचे इतर सदस्य ही या प्रसंगी सहभागी झाले. भारतीयांचे क्रिकेट वर प्रेम, मैत्रीची भावना अणि सर्वांना आपले करण्याची वृत्ती यामुळे जग किती छोटे आहे याचीप्रचिती मिळाली. 

सध्या लिविंग्स्टन मध्ये क्रिकेटची लोकप्रियता सातत्याने वाढते आहे, क्रिकेटची जादू सर्वांच्या डोक्यावर स्वार झालेली आहे. निलेश म्हात्रे यांनी सांगितले की न्यू जर्सी येथील संस्कृति या संस्थेतर्फे क्रिकेटची मुळे खोलवर रुजली जावी व सर्वांना उच्च स्तरावर खेळण्याची संधी मिळावी म्हणून येथील लहान मुलांसाठी नियमित प्रशिक्षण व मार्गदर्शन ही दिले जाणार आहे. मिलिंद सप्रे यांनी लिविंगस्टन मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला क्रिकेटपटू विकसित करण्याचे स्वप्न मांडले होते, ते काही महिन्यांपूर्वी साकार झाले. कौतुकास्पद गोष्ट  म्हणजे महिला खेळाडूंच्या संघाने सुद्धा तेवढयाच जोमाने व जिद्दिने खेळायला सुरूवात केली आहे. साता समुद्रापलीकडे या देशात राजनैतिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक विविधता असूनही क्रिकेटमुळे एकमेकांमधे प्रेम, मैत्री अणि जिव्हाळा कसा वाढवू आणि जोपासू शकतो हे अनुभवायला मिळाले.

भारतीय समाजाने अमेरिकेत आपल्या हुशारी आणि कौशल्यामुळे नाव आणि प्रतिष्ठा मिळवली आहे. त्याचबरोबर आपल्या आपुलकी आणि सर्वांना सामावून घेण्याच्या स्वभावामुळे आज लिविंगस्टनच्या क्रिकेटप्रेमी नागरिकांनी स्थानिकांची मनं जिंकली. या प्रसंगी चेष्टेने 'लगान' चित्रपटातलं "तीन गुना लगान" हे वाक्य आठवलं. सामंजस्य आणि सामोपचाराने, न भांडता न वाद घालता कसे मार्ग काढावे हे उत्कृष्ट उदाहरण या सर्व लिविंगस्टनवासियांनी दाखवून दिले.

Web Title: increase craze of cricket in Livingston

टॅग्स

संबंधित बातम्या

pravin tokekar
सर्पसत्र! (प्रवीण टोकेकर)

सूड तो सूड...त्यातून साधायचं काय, हा वरकरणी भाबडा वाटणारा सवाल विख्यात चित्रकर्मी स्टीव्हन स्पीलबर्गनं 2005 मध्ये एका चित्रपटाद्वारे केला होता. नाव...

dr shrikant karlekar
परतीचा विलंबित प्रवास... (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

परतीचा मॉन्सून या वर्षी काहीसा लांबण्याची चिन्हं आहेत. ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं असलं तरी...

bhagyashree bhosekar-bidkar
छोटासा घर होगा... (भाग्यश्री भोसेकर-बीडकर)

मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर शोधणं आणि मिळवणं ही अतिशय अवघड गोष्ट. "लव्ह पर स्क्वेअर फीट' ही वेब सिरीज त्यावर भाष्य करते. एकीकडं घराचा शोध आणि...

सटाणा मर्चंट्स बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ

सटाणा : येथील सटाणा मर्चंट्स को-ऑप बँकेच्या आज शनिवारी (ता.22) रोजी झालेल्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी संचालकांशी काही सभासदांनी...

कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांचे जीवन समाजाला प्रेरणादायी : जे. एन. ठाकरे

सटाणा : जात-पात आणि धर्माचे अडथळे दूर करत घराघरांत ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करून बहुजनांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या पद्मभुषण कर्मवीर डॉ. भाऊराव...