Sections

पुढील वर्षी रविवारसह 73 सुट्यांची पर्वणी

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 11 मे 2018
Year-2019-Holiday

मुंबई - यंदाच्या वर्षात रविवारी आलेल्या सार्वजनिक सुट्यांमुळे रजेच्या नियोजनाला कात्री लागली असली, तरी २०१९ मध्ये त्याची कसर भरून निघणार आहे. २०१९ मध्ये सण, समारंभ आणि सहलीच्या नियोजनासाठी नोकरदारांना सुट्ट्यांची खूशखबर आहे. २०१९ मध्ये तीन सुट्ट्या वगळता उरलेल्या २१ रजा इतर वारी येणार आहेत. रविवारसह एकूण ७३ सुट्ट्यांची पर्वणी मिळणार आहे.

मुंबई - यंदाच्या वर्षात रविवारी आलेल्या सार्वजनिक सुट्यांमुळे रजेच्या नियोजनाला कात्री लागली असली, तरी २०१९ मध्ये त्याची कसर भरून निघणार आहे. २०१९ मध्ये सण, समारंभ आणि सहलीच्या नियोजनासाठी नोकरदारांना सुट्ट्यांची खूशखबर आहे. २०१९ मध्ये तीन सुट्ट्या वगळता उरलेल्या २१ रजा इतर वारी येणार आहेत. रविवारसह एकूण ७३ सुट्ट्यांची पर्वणी मिळणार आहे.

२०१९ च्या दिनदर्शिका तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी पुढील वर्षीच्या सुट्ट्यांचे दिवस अधिक असल्याचे जाहीर केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लक्ष्मीपूजन आणि ईद-ए-मिलादच्या तीन सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यात रविवारला जोडून शनिवारी किंवा सोमवारी येणाऱ्या सुट्ट्यांची संख्या अनुक्रमे पाच आणि चार आहे. दुसरा किंवा चौथा शनिवार, नंतर रविवार आणि सोमवारचीही सुट्टी असा वीकेण्ड नियोजन करण्याची संधी नोकरदारांना एकदा  मिळणार आहे. सुट्ट्यांची अधिकृत यादी सरकार नंतर प्रसिद्ध करते, असे सोमण यांनी सांगितले.

2019 च्या सुट्या प्रजासत्ताक दिन  - शनिवार, २६ जानेवारी शिवाजी महाराज जयंती - मंगळवार, १९ फेब्रुवारी महाशिवरात्री - सोमवार, ४ मार्च होळी धूलिवंदन - गुरुवार, २१ मार्च गुढीपाडवा - शनिवार, ६ एप्रिल श्रीरामनवमी - शनिवार, १३ एप्रिल डॉ. आंबेडकर जयंती - रविवार, १४ एप्रिल श्रीमहावीर जयंती - बुधवार, १७ एप्रिल गुड फ्रायडे - शुक्रवार, १९ एप्रिल महाराष्ट्र दिन - बुधवार, १ मे बुद्ध पौर्णिमा - शनिवार, १८ मे रमजान ईद - बुधवार, ५ जून  बकरी ईद - सोमवार, १२ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन - गुरुवार, १५ ऑगस्ट पारसी न्यू इयर (पतेती) - शनिवार, १७ ऑगस्ट श्रीगणेश चतुर्थी - सोमवार, २ सप्टेंबर मोहरम - मंगळवार, १० सप्टेंबर महात्मा गांधी जयंती - बुधवार, २ ऑक्‍टोबर दसरा - मंगळवार, ८ ऑक्‍टोबर दिवाळी लक्ष्मीपूजन - रविवार, २७ ऑक्‍टोबर दिवाळी बलिप्रतिपदा - सोमवार, २८ ऑक्‍टोबर ईद-ए-मिलाद - रविवार, १० नोव्हेंबर गुरू नानक जयंती - मंगळवार, १२ नोव्हेंबर नाताळ - बुधवार, २५ डिसेंबर

Web Title: Year 2019 Holidays

टॅग्स

संबंधित बातम्या

Superhero superhero! (Forward)
सुपरहिरोंचा सुपरबाप! (अग्रलेख)

बालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...

आरक्षणाचा अहवाल आज सादर होणार

मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारला आज सादर होण्याचे संकेत आहेत. उच्च न्यायालयाच्या...

जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी

जैवविविधता समिती स्थापन करण्याची तंबी राजेश रामपूरकर नागपूर : जैवविविधता संवर्धन जैविक स्त्रोतांचा शाश्‍वत वापर, जैवविविधतेच्या न्याय्य वाटणीसाठी...

मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...

Pune Edition Editorial Article Raj North Indian arrow on Marm
राज यांचा "उत्तर भारतीय' बाणा! (मर्म)

शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...

एक लाख कोटींचा खड्डा 

नाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन...