Sections

महापौर - प्रशासन पुन्हा आमनेसामने ; प्रशासनाच्या असहकाराला उत्तर देण्यासाठी महापौर आक्रमक

सकाळ वृत्तसेवा |   रविवार, 25 मार्च 2018

पुढील सभेबाबत संभ्रम निर्माण झाल्याने पुन्हा एकदा हा विषय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी महापौर आणि प्रशासनात वाद झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन हा वाद मिटवला होता. 

ठाणे : ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे आणि महापालिका प्रशासन पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. विस्थापितांना दिलेल्या रेंटलच्या घरावरून महापौरांनी प्रशासनावर टीका केल्याने अधिकाऱ्यांनी थेट सर्वसाधारण सभेला दांडी मारली होती. प्रशासनाच्या असहकाराला उत्तर देण्यासाठी पुढील सभा आपण ठरवू, अशी भूमिका महापौरांनी घेतल्याचे कळते. त्यामुळे सभा नक्की कधी होईल याबद्दल सांशकता आहे. 

गेल्या सर्वसाधारण सभेत केवळ 35 (अ) चे विषय मंजूर केले होते. या वर्षीचा निधी वाया जाऊ नये यासाठी हे विषय मंजूर करण्यात येऊन ही सभा तहकूब केली होती. विशेष म्हणजे या सभेला सचिव अशोक बुरपुल्ले यांचा अपवाद वगळता सर्व अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. महापौरांनी प्रशासनावर टीका केल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे. या महिन्यातील मंगळवारी सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर लक्षवेधी आणि प्रश्‍नोत्तरांच्या तासामुळे सभा लांबली. त्यामुळे ती सभा तहकूब करून बुधवारी पुन्हा ही सभा घेण्यात आली होती; मात्र पालिका सचिवांव्यतिरिक्त एकही अधिकारी या सभेला उपस्थित राहिला नाही.

त्यामुळे सभा काही काळासाठी तहकूब केली. त्या दिवशी सर्वसाधारण सभा सुरू असतानाच आयुक्‍त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर मार्चअखेरच्या कामांमध्ये प्रशासकीय अधिकारी व्यग्र असून काही अधिकारी विधिमंडळ अधिवेशनात असल्याचे सांगून सचिवांनी कोणीही अधिकारी सभेला येणार नसल्याचे स्पष्ट केले. 

पुढील सभेबाबत संभ्रम 

मार्चपूर्वी आर्थिक बाबींचे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत, तर निधी वाया जाण्याची भीती असल्याने 35 (अ) अन्वये सादर केलेले प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यानंतर गैरहजर अधिकाऱ्यांबाबत कोणतीही टिप्पणी न करता सभा तहकूब केली. नुकतीच महापालिका सचिवांनी पुढील आठवड्यात सर्वसाधारण सभा घ्यावी अशी मागणी महापौरांकडे केली आहे; मात्र महापौरांनी ही सभा आता आपण ठरवू, अशी भूमिका घेतल्याचे कळते.

त्यामुळे पुढील सभेबाबत संभ्रम निर्माण झाल्याने पुन्हा एकदा हा विषय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी महापौर आणि प्रशासनात वाद झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन हा वाद मिटवला होता. 

Web Title: Thane News Mayor Administration both against administration non cooperation

टॅग्स

संबंधित बातम्या

चंद्रपूर जिल्ह्यात पोलिस मित्रांच्या हाती शिटी

गोंडपिपरी : समाजातील शांतता व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलिसदादा रात्रदिवस कार्यरत असतात. पण सणसमारंभाच्या काळात परिस्थिती सांभाळताना...

Two lakh illegal weapons were seized in Khatav taluka in satara
खटाव तालुक्‍यात दोन लाखांचा अवैध शस्त्रसाठा जप्त

सातारा : खटाव तालुक्‍यातील चौघांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चार गावठी पिस्तूल व तीन जिवंत राऊंड असा सुमारे दोन लाख सात हजार रुपयांचा ऐवज...

सभासदांच्या घरावरुन नांगर फिरवून आमदारकीची स्वप्ने बघू नयेत : डॉ. मोहिते

रेठरे बुद्रुक : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन बेफिकीरीने सुरु आहे. सभासदांच्या ऊसतोडी रखडतात. जलसिंचन योजना तोट्यात...

then start fighting says Municiple Corporation
...तर त्यांच्यासोबत ढिश्‍यूम.. ढिश्‍यूम... करा : महापालिका आयुक्त

औरंगाबाद : शहराला लाभलेल्या ऐतिहासिक वास्तूंची समाजकंटकांकडून तोडफोड केली जाते. अनेकजण कचरा टाकतात. समजून सांगितल्यानंतरही अनेक जण ऐकत...

Water-Supply
पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित

औरंगाबाद - शहराच्या पाणीपुरवठ्याची साडेसाती सुरूच आहे. गेल्या आठवड्यात वारंवार तांत्रिक बिघाड झाल्यानंतर आता गुरुवारी (ता.२०) फारोळा येथे वेलीमुळे...