Sections

विद्यार्थी होणार अवयवदाता

सकाळ वृत्तसेवा |   शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मुंबई - विद्यार्थ्यांच्या आयडी कार्डवर ते अवयवदाता असल्याची नोंद करण्याला परवानगी मिळाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी जोडलेल्या एक लाख विद्यार्थ्यांच्या आयडीवर ही माहिती नमूद करण्यात येणार आहे.

मुंबई - विद्यार्थ्यांच्या आयडी कार्डवर ते अवयवदाता असल्याची नोंद करण्याला परवानगी मिळाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी जोडलेल्या एक लाख विद्यार्थ्यांच्या आयडीवर ही माहिती नमूद करण्यात येणार आहे.

वैद्यकीय शिक्षण संचालनालय व संशोधन केंद्राने विद्यार्थ्यांच्या आयडी कार्डवर ऑर्गन डोनर असल्याची नोंद करण्यासाठी केलेल्या मागणीला वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्यता दिली.येत्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय शिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील एक लाख विद्यार्थ्यांच्या आयडी कार्डवर ते अवयवदाता असल्याची नोंद करण्यात येईल; तर मुंबई विद्यापीठाशी संलग्न ५०० महाविद्यालये व नाशिक विद्यापीठाशी संलग्न ३०० महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या आयडीवर नोंद होण्यासाठी पुढच्या टप्प्यात प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालनालय व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले. यासाठी विद्यापीठामार्फत किंवा वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून राज्यपालांची परवानगी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू नियमानुसार १८ ते ६० वर्षे वयाच्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास अवयवदान करता येते. तसेच रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू या वयोगटातील व्यक्तींचे असतात. हा कमावता वर्ग असल्याने घराबाहेर असल्याचे लक्षात घेण्यात आले आहे. तसेच रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू हे तरुण मुलांचे होतात. अनेकदा जखमी झालेल्या रुग्णाला मेंदू मृत जाहीर करण्यात आल्यानंतर अवयवदानासाठी त्यांच्या नातेवाईकांना समजावणे कठीण होऊन जाते. अशा मानसिक स्थितीत त्यांच्या जवळच्या व्यक्तीचीच तशी इच्छा असल्याने ते निर्णय घेण्यासाठी तयार होतात हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सवर अवयवदाता असल्याची नोंद करणे सोपे होईल

ड्रायव्हिंग लायसन्सवर अवयवदाता असल्याची नोंद करावी म्हणून गृह विभागाकडून प्रस्ताव ठेवण्यात आला होता. जो प्रस्ताव कायदे आणि विधी विभागाकडे पाठवण्यात आला. त्या वेळी अवयवदानाबाबतच्या कायद्यांविषयी फारशी माहिती नसल्याने निर्णय घेतला गेला नाही. आता मात्र याबाबत जागृती झाली आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या आय कार्डवर अवयवदाता म्हणून नोंद झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सवर नोंद होण्याची प्रक्रिया मार्गी लागेल. सर्वाधिक मृत्यू हे ड्रायव्हरचे होत असल्याने अशी नोंद केल्यास अवयवदानाचा टक्का वाढवण्यास मदत होईल.- डॉ. प्रवीण शिनगारे

Web Title: Students will be an organ donor

टॅग्स

संबंधित बातम्या

#FamilyDoctor फिट्स अनफिट

‘‘जरा बघा हो याच्याकडे. हा असे काय करतो आहे? दात खातो आहे, थरथरतो आहे. काय झाले असावे?’’ सौंभाग्यवतीनी हाक दिल्या दिल्या वडिलांनी येऊन पाहिले. तेव्हा...

लग्नानंतर दीपिकाचे नव्या घरी जोरदार स्वागत; दीपवीरचे भारतात आगमन

मुंबई- इटलीत विधी पूर्ण केल्यानंतर दीपिका पादुकोण व रणवीर सिंग रविवारी मुंबईत दाखल झाले. पण मुंबईत परतल्यानंतर दीपिकाने रणवीरसोबत एक खास विधी पूर्ण...

ujwal-nikam.jpg
आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी उपयोग करा : उज्वल निकम

परभणी : ''ज्ञान व बुध्दीसामर्थ्य सर्वांजवळ असते. परंतू ते ओळखता आले पाहिजे. आपले ज्ञान व बुध्दीसामर्थांचा देशहितासाठी कसा उपयोग करता येऊ शकेल हे...

barshi.jpg
खाजगी लक्झरी पलटी होऊन भीषण अपघात, तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

बार्शी  : मुखेड हुन मुंबईकडे निघालेल्या खाजगी लक्झरी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तीन चिमुकल्या...

मनपा'च्या 81 बॅंक खात्यांत दीडशे कोटी पडून 

जळगाव : "हुडको'चे कर्ज व गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबितचे कारण जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्याचे नेहमीचे सांगणे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या...

जळगावला मार्चअखेरपर्यंत चोवीस तास विमानसेवा 

जळगाव ः कुसुंबा (ता. जळगाव) येथील विमानतळावर मार्च 2019 पासून चोवीस तास विमानसेवा सुरू करण्याचे आदेश विमान सेवा प्राधिकरणाचे आहे. त्यानुसार...