Sections

ठाणे - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या 

दीपक हीरे |   शनिवार, 21 एप्रिल 2018
murder

शहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर पडले. त्यानंतर थेट त्यांचा मृतदेह भिवंडी तालुक्यातील देवचोळे गावच्या हद्दीतील जंगलात जळालेल्या अवस्थेत शुक्रवारी सकाळी आढळून आला. तर त्यांची कार ५ किमी. अंतरावरील घाडणे, चिंचवली गावच्या हद्दीत आढळून आली. या घटनेची माहिती समजताच परिसरातील शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा निषेध केला. 

शहापूर (ठाणे) : गुरुवारी मध्यरात्री निमसे यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने ते बाहेरून घराच्या दरवाजाची कडी लावून आपल्या हुंडाई सोनाटा कारने बाहेर पडले. त्यानंतर थेट त्यांचा मृतदेह भिवंडी तालुक्यातील देवचोळे गावच्या हद्दीतील जंगलात जळालेल्या अवस्थेत शुक्रवारी सकाळी आढळून आला. तर त्यांची कार ५ किमी. अंतरावरील घाडणे, चिंचवली गावच्या हद्दीत आढळून आली. या घटनेची माहिती समजताच परिसरातील शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा निषेध केला. 

 गंभीर घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णत काटकर, ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकटेश आंधळे, गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोनि. शेखर डोंबे आदींनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र मृतदेहाच्या न्याय वैद्यक तपासणीसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात रवाना केला आहे.

या घटनेने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना उपतालुकाप्रमुख निमसे यांचा खून पूर्वनियोजितपणे कट रचून केला आहे, असा आरोप ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील आणि पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी केला आहे. निमसे यांच्या हत्येत जंगली महाराज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय पत्नी साक्षी निमसे यांनी व्यक्त केला आहे. पतीच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र निमसे यांचा खून राजकीय वादातून की बांधकाम व्यवसायातून झाला? या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

Web Title: Shivsena's Shahapur taluka sub-chief Shailesh Nimse was killed

टॅग्स

संबंधित बातम्या

Sandeep Shetty
माफ करा; मी आत्ताच खून करून आलोय...

बंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला...

nanded
नांदेड : गणपूर गावात दरोडेखोरांचा हैदोस

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात रात्री दरोडेखोरांनी एक घर लुटले आहे. या दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून 1 लाख 71 ...

Cotton
कापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी

जळगाव - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रोत्साहनाने खानदेश, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात जिनिंगची संख्या वाढली, परंतु जिनिंगकडे हवा...

ullasnagar.
उल्हासनगरमध्ये वाढीव वीज बिलाच्या विरोधात साईपक्ष रस्त्यावर

उल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे....

pathak
राज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : विश्वास पाठक

परभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी...

savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर रेखाटले #माफीवीर सावरकर

औरंगाबाद : सिडको चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर या उड्डाणपुलावर माफीवीर सावरकर असा हॅशटॅग लिहण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.16) सकाळी समोर आली...