Sections

मुख्याध्यापकांना उभे राहण्याची शिक्षा!

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 मार्च 2018
Online

मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून घेण्यात आलेली कार्यशाळा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कार्यशाळा संपेपर्यंत बहुतेक मुख्याध्यापकांना उभेच राहावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून घेण्यात आलेली कार्यशाळा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कार्यशाळा संपेपर्यंत बहुतेक मुख्याध्यापकांना उभेच राहावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमवारी वडाळा येथील खालसा महाविद्यालयात मुंबईतील मुख्याध्यापक, शिक्षकांकरिता अकरावी ऑनलाइन प्रक्रिया समजावण्यासाठी कार्यशाळा घेतली होती; मात्र ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. नंतर ही कार्यशाळा माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयात घेण्यात आली होती; मात्र तेथे सभागृहाची जागा अपुरी पडली. या कार्यशाळेसाठी 500 जणांना बोलावण्यात आले होते; मात्र सभागृहाची क्षमता केवळ 300 जणांची होती. परिणामी, कित्येक मुख्याध्यापकांना संपूर्ण कार्यशाळेत जणू उभे राहण्याची शिक्षाच मिळाली होती. यासंदर्भात मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडिज यांनी संताप व्यक्त केला. याबाबत शिक्षण उपसंचालक आर. अहिरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.

Web Title: mumbai news headmaster punishment

टॅग्स

संबंधित बातम्या

मालवण येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

मालवण - शहरातील बसस्थानक नजीकच्या समाजमंदिर परिसरात राहणाऱ्या हर्षदा रामचंद्र मालवणकर (वय - २०) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आज सकाळी साडे अकरा...

Mumbai
नायर रुग्णालयतील बंद एमआरआय मशीन सुरु 

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील एमआरयआय मशीनला चिकटून राजेश मारु या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर बंद असलेली एमआरआय...

walhe
वाल्हेत पुनर्रचित अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न

वाल्हे : वेगाने बदलणाऱ्या शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समाजिक, भावनिक गरजा लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांत स्वसंकल्पना व...

Mantralaya-Mumbai
‘व्हिसलिंग वूड्‌स’ला भाडेपट्ट्याने जमीन

मुंबई - गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘मेसर्स व्हिसलिंग वूड्‌स इंटरनॅशनल लिमिटेड’ या संस्थेस साडेपाच एकर जमीन उच्च न्यायालयाच्या...

ST
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पास

मुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना बारावीपर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय...