Sections

आशा बगे यांना सेवाव्रती पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 20 मार्च 2018
Asha-Bage

मुंबई - आयुष्यभर साहित्याची व्रतस्थपणे सेवा करणाऱ्या, तसेच साहित्य क्षेत्रावर नाममुद्रा उमटवलेल्या व्यक्तीला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे यंदापासून "सेवाव्रती' पुरस्कार देण्यात येणार आहे. पहिल्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई - आयुष्यभर साहित्याची व्रतस्थपणे सेवा करणाऱ्या, तसेच साहित्य क्षेत्रावर नाममुद्रा उमटवलेल्या व्यक्तीला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे यंदापासून "सेवाव्रती' पुरस्कार देण्यात येणार आहे. पहिल्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांची निवड करण्यात आली आहे.

एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले राम शेवाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शेवाळकर यांच्या कुटुंबीयांनी प्रायोजित केलेला हा पुरस्कार बगे यांना समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कारासाठीच्या निवड समितीत महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, उपाध्यक्ष सुधाकर भाले, कार्यवाह इंद्रजित ओरके, कोषाध्यक्ष डॉ. विलास देशपांडे, महामंडळाच्या मराठवाडा साहित्य परिषदेचे न्या. नरेंद्र चपळगावकर, मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रकाश पायगुडे यांचा समावेश होता.

Web Title: mumbai news asha bage sevavruti award

टॅग्स

संबंधित बातम्या

‘तोंडी तलाक अध्यादेशामुळे मुस्लिम पुरुषांवर अन्याय’

मुंबई - मुस्लिम महिलांना दिलासा देणाऱ्या तोंडी तलाकच्या अध्यादेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या...

कुष्ठरोग शोधमोहीम सुरू

नवी मुंबई - कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नवी मुंबई शहरात सोमवार (ता. २४) पासून कुष्ठरोग शोधमोहिमेला...

imran khan
इम्रान यांची मुजोरी (अग्रलेख)

पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चेला नकार देण्याखेरीज भारतासमोर दुसरा पर्याय नव्हता. उभय देशांदरम्यान संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावयाची...

‘विराट’ घेण्यास महाराष्ट्र इच्छुक 

मुंबई : भारतीय नौदलात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या विराट या युद्धनौकेचा ताबा घेण्यास महाराष्ट्र सरकार इच्छुक आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारच्या...

A rare snake found in the Bhaipur rehab at Aarvi
भाईपुर पुनर्वसनात आढळला दुर्मिळ असलेला काळडोक्या साप

आर्वी (जि वर्धा) - आर्वी तालुक्यातील भाईपुर येथील रहिवाशी गजानन आहाके यांच्या इथे त्यांना साप आढळून आला असता त्यांनी आर्वी येथील पीपल्स फॉर ॲ...