Sections

चित्रपट, नाटकची नामांकने जाहीर

सकाळ वृत्तसेवा |   शनिवार, 5 मे 2018
Drama nominations released

मुंबई - नाटक, मालिका, वृत्तवाहिन्या आदींसाठी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारांची नामांकने नुकतीच एका शानदार सोहळ्यात जाहीर झाली आहेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा झाला. 

मुंबई - नाटक, मालिका, वृत्तवाहिन्या आदींसाठी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारांची नामांकने नुकतीच एका शानदार सोहळ्यात जाहीर झाली आहेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा झाला. 

चित्रपट विभागासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘नशीबवान’, ‘रेडू’, ‘पळशिची पिटी’, ‘मांजा’ आणि ‘कॉपी’ या चित्रपटांना नामांकने मिळाली. नाटक विभागातील नामांकन यादीत ‘वेलकम जिंदगी’, ‘माकड’, ‘संगीत देवबाभळी’, ‘अनन्या’ व ‘अशी ही श्‍यामची आई’ या नाटकांचा समावेश आहे. मालिका विभागातील पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कार नामांकनात ‘कुलस्वामिनी’, ‘सरस्वती’, ‘नकळत सारे घडले’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘लेक माझी लाडकी’ अशा एकूण पाच मालिकांमध्ये चुरशीची लढत रंगली आहे. यंदाचा १८ वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळा रविवारी (ता. ६) सायंकाळी ६.३० वाजता जोगेश्‍वरी येथील कमालीस्थान स्टुडिओ (कमल अमरोही) जेव्हीएलआर येथे रंगणार आहे.

Web Title: Movies Drama nominations released

टॅग्स

संबंधित बातम्या

उत्फुल्ल कारंजे (श्रद्धांजली)

जाड फ्रेमचा चष्मा, चेहऱ्यावर काहीसे बावळट भाव आणि डोळ्यात बेरकीपणा... अशा अवतारात किशोर प्रधान अवतरले की रंगभूमी किंवा चित्रपटांच्या पडद्याची चौकट...

संतोष आनंद यांनी जिंकली मने

पुणे - ते आले, बोलले आणि जिंकून गेले... ते कोण, तर हिंदी चित्रपट विश्‍वातील नावाजलेले गीतकार संतोष आनंद. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्दाला टाळ्या...

kishor-pradhan
प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन 

मुंबई - आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान (८३) यांचे निधन झाले आहे. अनेक नाटकांचे...

'अजिंक्य योद्धा' लवकरच रंगभूमीवर...

मुंबई- बाजीराव पेशवे  यांचे जीवन, कारकीर्द, कर्तृत्व आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 'अजिंक्य योद्धा'- श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ हे एक भव्य...

नाटक बुडण्याची वेळ येऊ नये - राज ठाकरे

पुणे - जी गोष्ट घरात बसून दिसते, चित्रपटांमधून पाहायला मिळते, ती सोडून आता नाटक करावे लागेल, याचा मराठी नाट्यनिर्मात्यांनी गांभीर्याने विचार...

'मराठी टिकवण्याची जबाबदारी सरकारची नाही'

नागपूर : मराठीसाठी शासनाने काहीतरी करावे, हे नाठाळ आणि आळशीपणाचे लक्षण आहे. सरकारने भाषेसाठी मंडळे स्थापन केली आहेत. माणसे नेमली आहेत. भाषा...