Sections

मेट्रो शहरांचा प्रवास जलद 

संतोष मोरे  |   सोमवार, 9 एप्रिल 2018
metro

मुंबई - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशातील चार प्रमुख शहरे हायस्पीड ट्रेनने जोडण्यात येणार आहेत. ताशी 130 किलोमीटरने धावणाऱ्या या गाड्यांसाठी योजना आखण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्‍विन लोहानी यांनी रेल्वेच्या सर्व विभागांच्या महाव्यवस्थापकांना दिले आहेत. 

मुंबई - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशातील चार प्रमुख शहरे हायस्पीड ट्रेनने जोडण्यात येणार आहेत. ताशी 130 किलोमीटरने धावणाऱ्या या गाड्यांसाठी योजना आखण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्‍विन लोहानी यांनी रेल्वेच्या सर्व विभागांच्या महाव्यवस्थापकांना दिले आहेत. 

दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या शहरांतून धावणाऱ्या गाड्यांचा वेग वाढवण्याचे पत्र लोहानी यांनी 21 मार्चला महाव्यवस्थापकांना दिले आहे. काही शहरांमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगमर्यादा आहे. ती मर्यादा हटवण्याची सूचना त्यांनी केली आहे. 13 एप्रिलपर्यंत सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना गाड्या वेग वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्ली-आग्रा मार्गावर ताशी 160 किमी धावणाऱ्या सर्वात वेगवान गाडीचा लोहानी यांनी यावेळी उल्लेख केला. या गाडीचा वेग आग्रा ते झांशीदरम्यान ताशी 130 किलोमीटर असतो. यामुळे या मार्गावर वेग वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

दिल्ली-कोलकाता व दिल्ली-मुंबई मार्गासाठी 18 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावरील रेल्वेतील जुने रूळ बदलून नवीन रूळ टाकणे, स्लीपर बदलणे, आधुनिक सिग्नल यंत्रणा, अधिक क्षमता असलेल्या विद्युत यंत्रणा कार्यान्वित करणे आदी कामे जलद हाती घेण्यात आली आहेत. रेल्वे मंत्रालयाने ही मोहीम वेगाने पूर्ण करण्यासाठी 2019 चे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे गाड्यांचा वेग ताशी 160-200 किलोमीटर होऊ शकतो. 

तेजसचा वेगही वाढणार  कोकण मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्‍स्प्रेससह गतिमान एक्‍स्प्रेस, हमसफर एक्‍स्प्रेस, महामना या अत्याधुनिक गाड्यांचा वेग ताशी 130 किलोमीटर करण्यात येणार आहे. तसेच काही भागांत हा वेग ताशी 130 किलोमीटरपेक्षा अधिक असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: metro cities fast travel

टॅग्स

संबंधित बातम्या

Return the bag of gold bangles received because of CCTV
'सीसीटीव्ही'मुळे मिळाली सोन्याच्या बांगड्या असलेली बॅग परत

नाशिक : गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक असा प्रवास करताना वयोवृद्ध महिला रिक्षामध्येच बॅग विसरल्या. त्या बॅगेत साडेसहा तोळ्याच्या 1 लाख 92 हजार...

दादर रत्नागिरी पॅसेंजर प्रवाशांनी रोखली

रत्नागिरी - गणेशोत्सव आटपून परतणाऱ्या चाकरमान्यांनी कोंकण रेल्वेला दणका दिला. दादर रत्नागिरी पॅसेंजरमध्ये जागा न मिळाल्याने संतापलेल्या...

हिरावली रत्नागिरीकरांची हक्काची पॅसेंजर 

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरुन रत्नागिरीकरांसाठी एकमेव हक्काची दादर-रत्नागिरी ही पॅसेंजर आहे. तीही दोन वर्षांपूर्वी मडगावपर्यंत नेण्यात आली....

jail
नांदेड : चोरी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद  

नांदेड : रेल्वेत प्रवाशांच्या नजरा चुकवून त्यांच्या किंमती साामानाची चोरी करणारी महिलांची टोळी लोहमार्ग पोलिसांनी पूर्णा परिसरातून 14 ...

chiplunkar
शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे निधन

औरंगाबाद : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे मंगळवारी (ता. 18) सकाळी औरंगाबाद येथे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. राज्याचे शिक्षण...