Sections

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आक्रमक व्हा -  उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
uddhav

मुंबई - राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्‍नावर शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात आक्रमक व्हावे, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांन सोमवारी दिले. 

राज्य सरकारने जनतेला अनेक आश्‍वासने दिली आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करा आणि अधिवेशनावर आपली छाप उमटवा, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली. विधान भवनाजवळील 'ट्रायडण्ट' या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत पक्षाचे मंत्रीही उपस्थित होते. 

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, यासाठी शिवसेनेने रान उठवले होते. त्यामुळे सरकारने 89 लाख शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेचे पुढे काय झाले, किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, किती शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाले आदी माहिती अधिवेशनात सविस्तर घ्या, अशी सूचना ठाकरे यांनी आमदारांना केली. 

या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आनंदराव अडसूळ यांनी मार्गदर्शन केले. 

Web Title: marathi news shivsena farmer uddhav thackeray

टॅग्स

संबंधित बातम्या

राज्याचे पर्यटन खाते समाधानकारक काम करण्यात अपयशी - राऊत

मालवण - ‘पंतप्रधान स्वदेश दर्शन’ या योजनेतंर्गत राज्यातून सिंधुदुर्गचा समावेश झाला. या योजनेसाठी मंजूर झालेल्या 83 कोटी रुपयांपैकी 22 कोटी रुपयांचा...

Two lakh illegal weapons were seized in Khatav taluka in satara
खटाव तालुक्‍यात दोन लाखांचा अवैध शस्त्रसाठा जप्त

सातारा : खटाव तालुक्‍यातील चौघांकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चार गावठी पिस्तूल व तीन जिवंत राऊंड असा सुमारे दोन लाख सात हजार रुपयांचा ऐवज...

arun-jaitley
राहुल हे ‘विदूषक युवराज’

नवी दिल्ली - ‘राफेल’ विमान खरेदी सौदा व बॅंकांची बुडीत कर्जे (एनपीए) यावरून सरकारवर आक्रमक प्रहार करणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षांना दिवसेंदिवस वाढत...

solapur
"सोलापूर शहर उत्तर'वर अनेक इच्छुकांचा  डोळा 

सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे संकेत महापौर शोभा बनशेट्टी यांनी पुन्हा दिले आहेत. त्यामुळे या मतदार संघाचे विद्यमान...

...तेव्हा सरसंघचालकांना खरा भारत समजेल 

मुंबई : "ज्या दिवशी सरसंघचालक जगाच्या सर्व मनुष्यजातीप्रमाणे आपलीही जात आहे, जी जगाच्या इतर जातींप्रमाणेच विकसित झाली असे म्हणतील, त्या वेळी त्यांना...