Sections

मुंबईचा विकास आराखडा मार्च महिन्यातच येणार - मुख्यमंत्री

ब्रह्मा चट्टे |   बुधवार, 14 मार्च 2018
Devendra Fadanavis

मुंबई : मुंबई महापालिकेने पाठवलेल्या विकास आराखड्याला याच महिन्यात म्हणजे मार्चमध्ये मान्यता देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत मुंबई शहरातील प्रश्नासंबंधी शिवसेनेचे विधानसभा प्रतोद सुनिल प्रभू यांनी नियम 293 अन्वये प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावावर शासनाच्या वतीने निवेदन करताना मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते.

मुंबई : मुंबई महापालिकेने पाठवलेल्या विकास आराखड्याला याच महिन्यात म्हणजे मार्चमध्ये मान्यता देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत मुंबई शहरातील प्रश्नासंबंधी शिवसेनेचे विधानसभा प्रतोद सुनिल प्रभू यांनी नियम 293 अन्वये प्रस्ताव दाखल केला होता. त्या प्रस्तावावर शासनाच्या वतीने निवेदन करताना मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुंबई महापालिकेने पाठवलेल्या विकास आराखड्याला याच महिन्या म्हणजे मार्च महिन्यात मान्यता देणार आहे. राज्य सरकारने नेमलेल्या छाननी समितीच्या माध्यमातून आराखड्यावर काम सुरू आहे. ज्या ठिकाणी न्यायालय व तांत्रिक अडचणी असतील अशा मोकळ्या जागा वगळता बाकी ठिकाणी आराखडा ठरवण्यात येईल.

कोळीवाडे, पाडे यांचे गावठाणांचे सिमांकन करण्याचे काम सुरू आहे. जर यात काही पाडे कोळीवाडे सुटले तर त्यासाठी महापालिका आयुक्तांचे प्राधिकरण नेमण्यात येणार येईल. महापालिकेने वैधानिक कार्यवाही करून प्रस्ताव पाठवा तर पाचशे ते सातशे फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात राज्य सरकार सुट देईल. मुंबईत गेल्या काही दिवसात छोट्या मोठ्या 15 ठिकाणी आगी लागल्या आहेत. त्यापैकी दोन मोठ्या घटनांची चौकशी चालू आहे. त्यापैकी भानूप्रसाद फरसाण व कमला मिल कंपाऊंडची घटना आहे. ज्याचा तपास सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Web Title: Marathi news mumbai news mumbai development plan in march devendra fadnavis

टॅग्स

संबंधित बातम्या

राफेल करार हा दोन सरकारमधला करार : फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन

न्यूयॉर्क : बहुचर्चित राफेल करार हा सरकार ते सरकार म्हणजेच त्यावेळेसच्या दोन सरकारमध्येच झाला आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 लढाऊ विमान...

0Shivsena_logo.jpg
तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी : शिवसेना

वाशी : तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन बुधवार (ता.२६ ) ला करण्यात आली आहे....

mokhada
अखेर निकृष्ट बांधकाम जमीनदोस्त, 'सकाळ'च्या बातमीचा परिणाम

मोखाडा : मोखाड्यातील सूर्यमाळ शासकीय आश्रमशाळेच्या संकुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. त्यावर सकाळने एका भागात चार मालिका...

31dead_body_5B1_5D.jpg
धर्माबाद तालुक्‍यात वीज पडून शेतकरी ठार 

नांदेड  :  शेतातून घराकडे परत येणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर नैसर्गीक वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बाभूळगाव (ता. धर्माबाद)...

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...