Sections

मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईला सुरवात

भगवान खैरनार |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
Mokhada

मोखाडा : मोखाडा तालुक्यात दरवर्षी जानेवारी - फेब्रुवारी पासुनच पाणी टंचाईला सुरूवात होते. चालू वर्षी 13 गावांमध्ये पाणी टंचाईला सुरूवात झालेली असून मौजे करोळ आणि वावळ्याचीवाडी येथे टिपवणं सदृष परिस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.

मागील वर्षी पाणी टंचाईग्रस्त गांवांची संख्या नव्वदीच्या घरात होती. या वर्षीही हा आकडा कायम रहाण्याचे चिन्हे आहेत. कारण हंगामी उपाययोजणे व्यतिरिक्त तालुक्यातील टंचाईग्रस्त गांवांसाठी हुकमी उपाययोजना केली जात नसल्याने वर्षानूवर्षे टंचाईग्रस्त आराखड्यावरील तीच ती गावे आजही ठाण मांडून बसलेली आहेत.

दरम्यानच्या अवधित पाणी टंचाई निर्मूलनासाठी केल्या गेलेल्या जलशिवार योजना, शिवकालीन पाणी साठवण योजणा, विहीरी, बुडके आदि उपाययोजनांमुळे भरीवपणे पाणीटंचाई दूर होण्याऐवजी मोजक्या लोकांची नाणेटंचाई दुर झालेली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडोच्या घरातील गांवपाडे आजही पाण्यासाठी व्याकुळ आहेत.

तालुक्यातील करोळ, वावळ्याचीवाडी, बिवलपाडा, तुंगारवाडी, आसे, शास्रीनगर, स्वामीनगर, कुंडाचापाडा, गोळीचापाडा, धामोडी, दापटी क्र. एक व दोन, धामणी या तेरा गांवांमध्ये टंचाई सदृष्य परिस्थिती असल्याने पाणी पुरवठा करण्याची मागणी आहे. याबाबत मोखाडा पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता गोळीचापाडा, दापटी क्र. एक व दोन, स्वामीनगर, बोहाडी आणि धामोडी येथेच पाणी टंचाईला सुरूवात होणार असल्याचे तसेच पाणी पुरवठा सुरू करावा लागणार असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले आहे. तर उर्वरीत ठिकाणी पाणी टंचाई असल्याबाबत पुरवठा विभागाने नकारघंटा वाजवली जात आहे. 

Web Title: Marathi news mumbai news mokhada shortage of water

टॅग्स

संबंधित बातम्या

File photo
हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड

हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड नागपूर : हॉटेल गंगाकाशीमधील हायप्रोफाइल सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी...

पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

पुणे - महापालिकेच्या विविध जलकेंद्र, पंपिंग स्टेशनच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (ता. २७) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार...

mangalwedha
पाण्यापासून वंचित गावे कर्नाटकाला जोडण्याची सहमती द्यावी : येताळा भगत

मंगळवेढा : बहुचर्चित मंगळवेढा तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवणार नसाल तर तालुक्यातील वंचीत गावे कर्नाटकाशी जोडण्यची सहमती द्यावी...

indapur
युवकांनी नवनवीन शेतीपुरक व्यवसाय सुरु करावेत : आ. भरणे

वालचंदनगर (पुणे) : युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन नवनवीन शेती पुरक व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे...

ulhasnagar
उल्हासनगरातील कृत्रिम तलावात 16 हजार 661 बाप्पांचे विसर्जन

उल्हासनगर : पालिकेने तयार केलेल्या पाच कृत्रिम तलावात उल्हासनगरातील गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले आहे. तलावातून 45 टन निर्माल्य जमा झाले...