Sections

बेकायदेशीर रिक्षा पार्क करणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई 

रविंद्र खरात  |   सोमवार, 5 मार्च 2018
marathi news mumbai kalyan rikshaw illegal parking traffic police

वाहतूक पोलिसांनी आज पासून कारवाईला सुरुवात केली असून आगामी काळात काही दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) कल्याण परिसरात अनेक बस स्टॉप आहेत. मात्र त्यावर दुचाकी, कार, खासगी बस आणि रिक्षा बेकायदेशीर पार्क करणाऱ्या विरोधात वाहतूक पोलिसांनी आज पासून कारवाईला सुरुवात केली असून आगामी काळात काही दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) बसेस कल्याण पश्चिम मधून मुरबाड रोड आणि बिर्ला कॉलेज रोडने धावतात, प्रवासी वर्गाला उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी अनेक ठिकाणी केडीएमटीने बस स्टॉप बांधले आहेत. मात्र त्यावर रिक्षा, खासगी बसेस, दुचाकी, वाहन चालकांनी वाहन बेकायदेशीर रित्या पार्क करत असल्याने सर्व सामान्य नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. 

अनेक नागरीकांच्या तक्रारी पाहता आज सोमवारी (ता 5 मार्च) सकाळी कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली बेशिस्त वाहन चालकाविरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात झाली. केडीएमटी बसस्टॉप वर बेकायदा पार्क करणाऱ्या 8 रिक्षा चालक तर चौथे सीट प्रवासी घेऊन प्रवास करणाऱ्या आणि नियम न पाळणाऱ्या 20 रिक्षा चालकाविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ही पुढील आदेश येईपर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

रिक्षा चालकांनी त्यांना दिलेल्या रिक्षा स्थानक मधून व्यवसाय करावा, नियमाचे पालन करावे, बसस्टॉपवर रिक्षा किंवा अन्य वाहनांनी वाहन पार्क केल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल, ही कारवाई पुढील आदेश येई पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली.

 

Web Title: marathi news mumbai kalyan rikshaw illegal parking traffic police

टॅग्स

संबंधित बातम्या

kalyan
लोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार ?

कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...

sahitya
रविवारपासून कल्याणमध्ये  44 वे महानगर साहित्य संमेलन 

कल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...

'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील

मुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...

Dombivali
भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानात सापडला शस्त्रास्त्रांचा साठा 

डोंबिवली  : डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरात फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून तब्बल 170...

kalyan
कल्याणमध्ये समाजकंटकानी 7 दुचाकी पेटविल्या 

कल्याण - ठाण्यामध्ये दुचाकी जळीतकांड गाजत असताना कल्याण पूर्व मधील चक्कीनाका हाजीमलंग रस्त्यावरील आडवली ढोकली परिसरात गणेश चौकातील श्री. साई...

prof kuldeepsingh rajput
परिघावरील तरुणाईला प्रवाहात आणा

पस्तीशीच्या खाली असणाऱ्या निम्म्याहून अधिक युवक लोकसंख्येचे ‘उत्पादक मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे नजीकच्या भविष्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी...