Sections

बुलेट ट्रेन टर्मिनससाठी जमीन हस्तांतरण आज 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
bullet-train

मुंबई - वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या बुलेट ट्रेनच्या भूमिगत टर्मिनससाठी आवश्‍यक जमीन हस्तांतरण प्रक्रिया मंगळवारी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टर्मिनसच्या बांधकामासाठी आवश्‍यक जमिनीचे दस्ताऐवज रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना देतील. 

ज्या जमिनीवर हे टर्मिनस उभारण्यात येणार आहे, तेथे आंतरराष्ट्रीय वित्त सेवा केंद्रही (आयएफएससी) उभारले जाणार असल्याची शक्‍यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुख्यालयाजवळ असलेला पेट्रोल पंपही भूमिगत बांधण्यात येणार आहे. 

भूमिगत टर्मिनसची रचना राष्ट्रीय जलद निगम रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) केली असून, रेल्वे मंत्रालय हा प्रकल्प साकारत आहे. या स्थानकात सहा फलाट असतील. एमएमआरडीएच्या मुख्यालयाजवळील भूमिगत बुलेट ट्रेन स्थानकाच्या इमारतीत दुकाने, तिकीट आरक्षण केंद्र आणि फूड कोर्ट असेल. 

बुलेट ट्रेनच्या देखभालीसाठी आवश्‍यक जागा सर्वांत वरच्या मजल्यावर असेल. प्रशासन आणि उपकरणासाठीही या मजल्याचा वापर केला जाईल. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दुकाने, फूड कोर्ट असेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: marathi news mumbai Bullet train

टॅग्स

संबंधित बातम्या

Pune
'डीजे' नाहीतर विसर्जन नाही; पुण्यातील मंडळांचा इशारा

पुणे : ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साऊंड सिस्टिमवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ यंदा गणपती विसर्जनाच्या...

harshavardhan-patil
राजे उमाजी नाईक हे आद्य क्रांतिकारक - हर्षवर्धन पाटील

इंदापूर - भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजाविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील राजे उमाजी नाईक हे आद्य - क्रांतिकारक होते. त्यांच्या...

Village Rockstars
'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत

मुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा...

images.jpg
अष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व

योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...

vidarbha
एटापल्ली : माओवाद्यांची पोस्टर, बॅनर आढळले

एटापल्ली : तालुक्यातील वादग्रस्त सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसरातील मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी पोस्टर व बॅनर लावून पार्टी स्थापनेचा चौदावा वर्धापन...