Sections

मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ साकारणार 

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
marathi

मुंबई -  मराठी भाषेतील पहिले विद्यापीठ मुंबईतील वांद्रे येथे उभारण्यात येणार आहे. "ग्रंथाली'ने केलेल्या पाठपुराव्यानंतर मुंबई महापालिकेने वांद्रे बॅंडस्टॅंड येथील जागा या विद्यापीठासाठी देण्याचे मान्य केले आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत विधानभवनात होणाऱ्या कार्यक्रमात त्या संदर्भातील अधिकृत पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "ग्रंथाली'च्या पदाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. 

मुंबई -  मराठी भाषेतील पहिले विद्यापीठ मुंबईतील वांद्रे येथे उभारण्यात येणार आहे. "ग्रंथाली'ने केलेल्या पाठपुराव्यानंतर मुंबई महापालिकेने वांद्रे बॅंडस्टॅंड येथील जागा या विद्यापीठासाठी देण्याचे मान्य केले आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत विधानभवनात होणाऱ्या कार्यक्रमात त्या संदर्भातील अधिकृत पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "ग्रंथाली'च्या पदाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. 

मराठी भाषेसाठीच्या स्वतंत्र विद्यापीठाची मागणी 80 वर्षांपासून होत होती. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही ही मागणी सातत्याने होत होती; मात्र त्या दृष्टीने ठोस पावले उचलली गेली नव्हती. राज्यात शिवसेना-भाजपचे राज्य आल्यानंतर या विद्यापीठासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची विनंती भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडे केली होती. त्यानंतर आपल्या मतदारसंघात हे विद्यापीठ असावे, या दृष्टीने शेलार यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. वांद्रे येथे बॅंडस्टॅंड येथील जागा देण्याचे पालिकेने मान्य केले आहे. त्याबाबतचे पत्र मंगळवारी (ता. 27) विधानभवनात होणाऱ्या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. या विद्यापीठाची रचना कशी असावी, तेथे भाषेसाठी पोषक असलेले कोणते उपक्रम राबवावेत याबाबतचे नियोजन सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

असे असेल विद्यापीठ   -मराठीतील सर्व ग्रंथ व पुस्तके असतील.  - परीक्षा, संशोधन, लेखन, प्रोत्साहन असे उपक्रम राबविणार 

अन्य भाषांची विद्यापीठे  केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आजवर तमीळ (2004), संस्कृत (2005 ), तेलुगू, कन्नड (2008), मल्याळम (2013 ) आणि ओडिशा (2014 ) या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यापैकी तमीळ (1981 ), तेलुगू (1985 ), कन्नड (1991 ), मल्याळम (2012 ) या भाषांची आपापल्या राज्यांत स्वतंत्र विद्यापीठे आहेत. संस्कृत भाषेचीही केंद्रीय, अभिमत आणि खासगी अशी अनेक विद्यापीठे देशाच्या वेगवेगळ्या भागांत आहेत. उर्दू, हिंदी आणि इंग्रजीसह परकी भाषांसाठी केंद्रीय विद्यापीठे आहेत. मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ (1998 ) हैदराबादला आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय (1997) महाराष्ट्रात वर्धा येथे आहे; मात्र आजवर मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ नव्हते.

Web Title: marathi news marathi university mumbai

टॅग्स

संबंधित बातम्या

लग्नानंतर दीपिकाचे नव्या घरी जोरदार स्वागत; दीपवीरचे भारतात आगमन

मुंबई- इटलीत विधी पूर्ण केल्यानंतर दीपिका पादुकोण व रणवीर सिंग रविवारी मुंबईत दाखल झाले. पण मुंबईत परतल्यानंतर दीपिकाने रणवीरसोबत एक खास विधी पूर्ण...

mumbai
...तर , कृत्रिम प्राणवायू विकत घेऊन जगावे लागेल      

डोंबिवली : चांगली संवर्धन केलेली झाडे मोठ्या प्रमाणावर भस्मसात झाली ही घटना नक्कीच निंदनीय आहे. आपल्या पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी आपण...

शेतकऱ्यांच्या विम्यावर कंपन्या मालामाल

सोलापूर : मागील दोन वर्षांत राज्यातील 20 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी रब्बीसाठी पीकविमा भरला. मात्र, त्यापैकी फक्‍त सहा लाख 27 हजार शेतकरीच भरपाईसाठी...

सोलापूर बाजार समितीचा राष्ट्रीय बाजार करण्याच्या हालचाली

सोलापूर : ज्या बाजार समित्यांमध्ये तीन राज्यांतून शेतमालाची आवक 30 टक्के होते त्या बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांचा राष्ट्रीय बाजार...

'मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मीच"

पणजी- मुख्यमंत्रीपदाचा आपण उमेदवार आहे असे सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रांत संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी राजकीय चर्चेला पूर्णविराम दिला...

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम महिनाभरात सुरू होणार 

जळगाव ः शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा जो नकाशा (जुना) महापालिकेने 2012 मध्ये मंजूर केला होता त्याप्रमाणे शिवाजीनगर उड्डाणपूल तयार करण्याचे...