Sections

केडीएमटीच्या  अनुदानासाठी पालिकेला साकडे

सकाळ वृत्तसेवा |   बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
KDMT

कल्याण -  कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन समितीला (केडीएमटी) आर्थिक ताकदीची गरज असून सार्वजनिक उपक्रमाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आर्थिक पाठबळ द्या, असे प्रतिपादन केडीएमटीचे सभापती संजय पावशे यांनी मंगळवारी (ता. २७) अंदाजपत्रक सादर करताना महापालिकेला घातले.

कल्याण -  कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन समितीला (केडीएमटी) आर्थिक ताकदीची गरज असून सार्वजनिक उपक्रमाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आर्थिक पाठबळ द्या, असे प्रतिपादन केडीएमटीचे सभापती संजय पावशे यांनी मंगळवारी (ता. २७) अंदाजपत्रक सादर करताना महापालिकेला घातले.

सभापती संजय पावशे यांनी आज दुपारी केडीएमटीचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले. या वेळी स्थायी समिती सभापती राहुल दामले, आयुक्त पी. वेलरासू, संजय जाधव, स्थायी समिती सदस्य, परिवहन समिती सदस्य आणि पालिका अधिकारी आदी उपस्थित होते. केडीएमटीचा २०१७-१८ चा सुधारित जमा ८५ कोटी ४९ लाख ४८ हजार रुपये, खर्च ८२ कोटी ९९ लाख ३२ हजार रुपये आणि शिल्लक दोन कोटी ५० लाख सहा हजार रुपयांचे अंदाजपत्रक तसेच २०१८-१९ साठीचा जमा ११८ कोटी १२ लाख ४० हजार, खर्च ११५ कोटी ४५ लाख २४ हजार रुपये आणि दोन कोटी ६७ लाख १६ हजार रुपये शिलकीचे अंदाजपत्रक संकल्प पावशे यांनी सादर केले. केडीएमटीच्या बसमधून सवलतीच्या दरात अपंग, अंध, विद्यार्थी, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक आदींना प्रवास दिला जातो. आता शालेय विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचा मानस असून राज्य सरकारच्या निधीमधून महिला विशेष तेजस्विनी बस सुरू करणार असल्याचे सभापती पावशे यांनी या वेळी सांगितले.

Web Title: marathi news KDMT municipal corporation

टॅग्स

संबंधित बातम्या

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी अग्रगण्य पतसंस्था - हर्षवर्धन पाटील

इंदापूर- इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीने शिक्षकांची पत वाढवत राज्यातील अग्रगण्य पतसंस्था असा नावलौकीक संपादन केला आहे. सोसायटीने पारदर्शी...

MNP nashik
महापौरांच्या घरात आयुक्त मुंडे यांच्यावरुन बंद दाराआड शाब्दिक चकमक (व्हिडिओ)

नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून सत्ताधारी भाजपची झालेली कोंडी व गेल्याकाही दिवसांपासून करवाढीवरून सुरू असलेला वाद...

Dengue
लातूरमध्ये डेंगीचे नऊ रुग्ण

लातूर - गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या कारणांमुळे शहरातील डेंगीचे संशयित रुग्ण वाढत आहेत. मागील दोन आठवड्यांत केवळ शासकीय वैद्यकीय सर्वोपचार...

junnar
जुन्नरला युवा सेनेच्या वतीने मोफत कापडी पिशवीचे वाटप

जुन्नर : राज्य सरकारच्या प्लॅस्टिक प्लस्टिक बंदीच्या निर्णयाचे स्वागत करीत जुन्नर युवा सेनेचे तेजस बोठे यांनी आज शहरातील कल्याण पेठ, नेहरू बाजार...

korade
खोडदचे जालिंदर कोरडे यांना राज्य सरकारचा वनश्री पुरस्कार 

जुन्नर (पुणे) : खोडद ता.जुन्नर येथील जालिंदर शिवराम कोरडे यांना राज्य सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला असून या...