Sections

....आता मंत्रिमंडळात पुन्हा परतण्याची इच्छा नाही - एकनाथ खडसे

विजय गायकवाड |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Eknath_Khadse

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ खडसेंना सरकारमध्ये समावेश आणि खडसेंचे पुनवर्सन कधी होणार? या प्रश्नांना खुद्द एकनाथ खडसेंनीच आता पुर्णविराम दिला असून आता या सरकारमधे मंत्री होण्याची अजिबात इच्छा नसल्याचे 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले आहे. जळगाव जिल्ह्यातील नादूरुस्त रस्त्यासंह प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी  लोकप्रतिनिधींसह सभागृहात आणि सभागृहाबाहेर आवाज बुलंद करणार असल्याचे खडसे  म्हणाले.

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ खडसेंना सरकारमध्ये समावेश आणि खडसेंचे पुनवर्सन कधी होणार? या प्रश्नांना खुद्द एकनाथ खडसेंनीच आता पुर्णविराम दिला असून आता या सरकारमधे मंत्री होण्याची अजिबात इच्छा नसल्याचे 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले आहे. जळगाव जिल्ह्यातील नादूरुस्त रस्त्यासंह प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी  लोकप्रतिनिधींसह सभागृहात आणि सभागृहाबाहेर आवाज बुलंद करणार असल्याचे खडसे  म्हणाले.

खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त जमीन खरेदीप्रकरणी चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती झोटिंग यांनी सरकारला अहवाल देऊन सहा महीने उलटले. हा अहवाल मुख्य सचिवांकडे सीलबंद स्वरूपात ठेवण्यात आला आहे. मंत्रिमंडळातील प्रवेशाविषयी खडसेंना विचारले असता ते म्हणाले, आता मंत्रिमंडळात प्रवेशाची माझी इच्छाच  उरली नाही. जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण झाली असून आम्ही सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. कृषी संशोधन संस्था आणि महाविद्यालयाचे प्रश्न कायम आहेत. जनता व्यथित असताना आता मंत्री होऊन करणार काय?सभागृहात आणि सभागृहाबाहेर सरकारला जाब विचारु असे खडसेंनी सांगितले.

खडसेंनी पक्षासाठी ४० वर्षे काम केले असून वर्षभराहून अधिक काळ ते मंत्रिमंडळाबाहेर आहेत. त्यांना झाली एवढी शिक्षा पुरेशी आहे, असे मत सकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांचे आहे. मध्यंतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून पक्षप्रवेशासाठी आलेले खुले आमंत्रण आणि खडसेंनी सरकारविरोधी दिलेले खुले आव्हान चर्चा रंगली होती. आता तर मंत्रिमंडळ  प्रवेशाचा पर्यायावर स्वतःहून फुली मारल्याने नाथाभाऊंचे आगामी राजकारण प्रखर अाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: marathi news eknath khadse maharashtra cabinet bjp

टॅग्स

संबंधित बातम्या

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

2ajit_pawar_26.jpg
मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा : अजित पवार 

औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची...

सांगली महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी अजिंक्‍य पाटील निश्‍चित

सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित...

Raj Thackeray greets Manmohan Singh on his birthday
माझ्या सकट, भारतीयांना तुमच्या ज्ञानाची उणीव भासते- राज ठाकरे

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांना आपल्या खास शैलीत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. राज...

मालवण येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

मालवण - शहरातील बसस्थानक नजीकच्या समाजमंदिर परिसरात राहणाऱ्या हर्षदा रामचंद्र मालवणकर (वय - २०) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आज सकाळी साडे अकरा...