Sections

वाढत्या उष्म्यामुळे पक्ष्यांना धोका 

मयूरी चव्हाण-काकडे |   बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
birds.

कल्याण - वातावरणामध्ये दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला असून याचा नागरिकांप्रमाणेच पक्ष्यांनाही त्रास होत आहे. अशा तापमानात आकाशात विहार करताना पक्ष्यांच्या पोटातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पक्षी मुर्च्छित होतात आणि कोसळतात. दरवर्षी उन्हाळ्यात अनेक पक्षी डिहायड्रेशनचा त्रास झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला पडलेले दिसतात. सध्या उन्हाची चाहूल लागलेली असून अनेक ठिकाणी पक्षी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा अधिक वाढणार असल्याने पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करा, असे आवाहन पक्षिप्रेमींनी केले आहे. 

कल्याण - वातावरणामध्ये दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला असून याचा नागरिकांप्रमाणेच पक्ष्यांनाही त्रास होत आहे. अशा तापमानात आकाशात विहार करताना पक्ष्यांच्या पोटातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पक्षी मुर्च्छित होतात आणि कोसळतात. दरवर्षी उन्हाळ्यात अनेक पक्षी डिहायड्रेशनचा त्रास झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला पडलेले दिसतात. सध्या उन्हाची चाहूल लागलेली असून अनेक ठिकाणी पक्षी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा अधिक वाढणार असल्याने पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करा, असे आवाहन पक्षिप्रेमींनी केले आहे. 

वृक्षतोडीमुळे वाढणाऱ्या सिमेंटच्या जंगलांमुळे शहरातील उष्मा वाढतो आहे. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे माणसाला जिव्हारी लागत असताना अन्नाच्या शोधात घरट्याबाहेर पडणाऱ्या पक्ष्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. शहरी भागात पक्ष्यांची अन्नसाखळी तुटल्यामुळे अन्नाच्या शोधात पक्षी दूर अंतरावर उडत जातात. उष्मा वाढत असल्यामुळे पक्षीही सूर्योदयापूर्वी घरट्यातून बाहेर पडत असून लवकर घरी परतण्याच्या तयारीत असतात; मात्र काही वेळा उन्हाच्या झळा पक्ष्यांसाठी घातक ठरतात. मार्च-एप्रिल महिन्यात हे तापमान आणखी वाढण्याची शक्‍यता आहे, असे मत पक्षिप्रेमी इकोड्राईव्ह यंगस्टर्स संस्थेचे सदस्य महेश बनकर यांनी व्यक्त केली. 

पक्षी उष्मरक्तीत असून १०४ ते १०५ अंश इतके त्यांच्या शरीराचे तापमान आहे. तेव्हा त्यांच्या शरीराचे तापमान वाढते. म्हणून शरीरातील उष्णतेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पक्षी पंख पसरवून तोंडाने श्वसनक्रिया करतो. अनेक प्रकारच्या पिसांनी त्यांचे शरीर आच्छादलेले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत त्यांच्या शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढते. रस्त्यात एखादा पक्षी मूर्च्छित होऊन पडला असेल, तर अशा पक्ष्याला सावलीत ठेवावे. गार हवा मिळेल अशा दृष्टीने जागा करून शक्‍य झाल्यास सुरुवातीला एनर्जी ड्रिंक आणि नंतर कलिंगड, टरबूज, काकडी त्याला खाण्यास द्यावी, अशी माहिती ठाणे आणि रायगड पक्षिनिरीक्षण अभ्यास संघटनेचे सदस्य हिमांशु टेंभेकर यांनी दिली. 

उष्मा वाढल्याने पक्ष्यांना शरीर थंड राहावे, यासाठी पाण्याची गरज आहे; त्यामुळे घरातील खिडकी, बाल्कनी, टेरेस अथवा झाडांवर पाणवठे तयार करावेत. जेणेकरून तहानलेले पक्षी या पाणवठ्यांवर येऊन तृष्णा भागवून जातील. - नीलेश भणगे, पॉज संस्था, संस्थापक.

Web Title: marathi news birds temperature summer

टॅग्स

संबंधित बातम्या

ओला, उबरच्या संपला संमिश्र प्रतिसाद (व्हिडीओ)

मुंबई : ओला, उबर वाहन चालकांनी काल रात्री पासून अघोषित संप पुकारला आहे. मध्यरात्रीपासून अनेक भागातील ओला, उबर वाहन सेवा ठप्प होती. त्याला आज मुंबई,...

vajreshvari.
वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानामध्ये सव्वातीन कोटींचा अपहार

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानात जवळपास सव्वा तीन कोटी रुपयांच्या अपहार झाला आहे. या प्रकरणी विश्वस्थ...

pali
राम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर

पाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...

rasayni
रस्त्यावरील खड्डे आणि मातीच्या धुळीचा त्रास नागरिकांना 

रसायनी (रायगड) - औद्योगिक क्षेत्रात पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे.  आशी नागरिकांची तक्रार आहे....

अकोल्यातील ठाणेदारांचे लवकरच खांदेपालट

अकोला : जिल्ह्यातील विकासकामांचा अाढावा बुधवारी (ता. 14) मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील कायदा अाणि सुव्यवस्थेचाही अाढावा घेण्यात...

pune
रिक्षा चालकाचा प्रामाणिक पणाबद्दल सत्कार

वारजे माळवाडी :  रिक्षात विसरलेली बॅग रिक्षा चालकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात आणून दिली. संजय धोंडिबा चव्हाण (रा राहटणी रायगड कॉलनी) हे...