Sections

मागेल त्याला रिक्षा, टॅक्सी परवाने योजना बंद करा

रविंद्र खरात |   शनिवार, 7 एप्रिल 2018
kalyan

कल्याण - राज्य शासनाच्या परिवहन विभागाने कोकणासहित ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि एम.एम.आर.टी.ओ. क्षेत्रात मागेल त्याला टॅक्सी आणि ऑटो रिक्षा परवाने देण्यास सुरुवात केली. मात्र अनेक शहरातील वाहतूक कोंडी आणि कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, जुने रिक्षा आणि टॅक्सी चालक बेरोजगार होत आहेत. या योजनेला स्थगिती द्यावी अशी मागणीसाठी रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आज यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन निवेदन देऊन समस्या मांडली. 

कल्याण - राज्य शासनाच्या परिवहन विभागाने कोकणासहित ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि एम.एम.आर.टी.ओ. क्षेत्रात मागेल त्याला टॅक्सी आणि ऑटो रिक्षा परवाने देण्यास सुरुवात केली. मात्र अनेक शहरातील वाहतूक कोंडी आणि कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, जुने रिक्षा आणि टॅक्सी चालक बेरोजगार होत आहेत. या योजनेला स्थगिती द्यावी अशी मागणीसाठी रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आज यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन निवेदन देऊन समस्या मांडली. 

कोकण विभागातील ठाणे जिल्हा सहित एम.एम.आर.टी.ओ. क्षेत्रात सुमारे एक लाख रिक्षा टॅक्सी प्रवासी सेवा करीत असून, तीन ते चार लाख कुटुंबियांचा उदरनिर्वाह होत आहे. राज्य शासनाने मागेल त्याला ऑटो आणि टॅक्सी परवाना खुले केल्यामुळे अनेक खासगी कंपन्या बेकायदेशीर प्रवासी वाहने, इतर पर्यायी सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा आणि खुले केलेले ऑटो रिक्षा टॅक्सी परवाने यामुळे शहरात प्रवासी घेण्यासाठी जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. 

1997 ते 2014 या कालावधीत महाराष्ट्र राज्यात ऑटो रिक्षा परवाने बंद होते. 2014 ते 2016 या कालावधीत गरजेनुसार परवाने वाटप करण्यात आले. यामुळे मुंबई, एम.एम.आर.टी.ओ., आणि मुंबई उपनगरात टॅक्सी आणि रिक्षाची संख्या समतोल होती. मात्र कल्याण डोंबिवली शहरासहीत अन्य शहरातील रस्ते, लोकसंख्या, अन्य वाहने, सर्व्हे, महानगर पालिका, रिक्षा संघटना याचा विचार न करता मागेल त्याला रिक्षा टॅक्सी परवाने खुले केल्याने ज्या व्यक्तीला शहराची माहिती नाही अशांनाही परवाने मिळाले आहेत. यामुळे शहरात टॅक्सी आणि रिक्षाची संख्या झपाट्याने वाढ झाली आहे. 

या योजनेला स्थगिती द्यावी या मागणीसाठी आज शनिवार ता 7 एप्रिल रोजी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट  रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांच्या नेतृत्वाखाली संतोष नवले, अविनाश खिलारे विनायक सुवै, राजु राउत, अंकुश म्हात्रे, शेखर जोशी, सुनील बोर्डे, निवृत्ती कुचिक, जितेंद्र पवार, सतिष आचार्य आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन देत साधक बाधक चर्चा केली. यावेळी अधिकारी वर्गाची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी रिक्षा संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले.

Web Title: auto rickshaw taxi license

टॅग्स

संबंधित बातम्या

Ganesh Festival : ढोल-ताशा पोहोचला साता-समुद्रापार

सध्या ढोल-ताशावर टीका होते, ती आवाजामुळे आणि पथकांच्या वाढत्या संख्येमुळे. ध्वनिप्रदूषण आणि डेसिबल हे शब्द उत्सवाच्या काळात हमखास चर्चेत येतात....

amazon-more
दिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)

भारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’...

"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले  

मुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...

महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख हेक्‍टर 

मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के भूभाग सिंचनाखाली असल्याने महाराष्ट्राची कृषी क्षेत्रातील प्रगती रेंगाळत असतानाच फडणवीस सरकारने गेल्या...

योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर कारवाई होणार 

मुंबई - उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पुढे योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर...