Sections

कल्याण - बदल्या होऊनही अधिकारी पालिकेतच..

सुचिता करमरकर |   बुधवार, 4 एप्रिल 2018
KDMC

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांचा कालावधी संपल्यावर त्यांची बदली करण्यात येते. परंतु त्यानंतरही हे अधिकारी पालिकेत सेवा बजावत असल्याचे दिसून येत आहे. प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्याने कक्ष संवर्गातील अधिकारी मिलींद धाट यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. यापूर्वी मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरसकर यांची बदली झाली आहे. मात्र त्यानंतरही हे अधिकारी पालिकेतच सेवा करत आहेत. 

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांचा कालावधी संपल्यावर त्यांची बदली करण्यात येते. परंतु त्यानंतरही हे अधिकारी पालिकेत सेवा बजावत असल्याचे दिसून येत आहे. प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्याने कक्ष संवर्गातील अधिकारी मिलींद धाट यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. यापूर्वी मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरसकर यांची बदली झाली आहे. मात्र त्यानंतरही हे अधिकारी पालिकेतच सेवा करत आहेत. 

राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी पालिकेत प्रति नियुक्तीवर येतात. त्यांचा दोन वर्षांचा कालावधी पुर्ण झाल्यावर शासन आदेशानुसार त्यांची बदली करण्यात येते. या पत्रानुसार त्यांनी त्वरित नियुक्ती झालेल्या जागी रुजू व्हावे अन्यथा ते रुजू होईपर्यंत त्यांच्या सेवेत खंड समजला जाईल असे बदलीच्या आदेशात म्हटले जाते. परंतु कडोमपामधील उपायुक्त धनाजी तोरसकर आणि मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण यांची बदली होऊन काही कालावधी लोटला असूनही ते पालिकेतील आहेत. मग यांच्या सेवा खंडित झालेल्या का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान पालिकेतील मिलींद वाट यांचीही मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. ते आता आपल्या नियुक्तीच्या जागी कधी रुजू होणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 

प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या कामावर लोक प्रतिनिधी कायमच नाराजी व्यक्त करत असतात. त्यांना राज्य शासनाच्या सेवेत परत पाठवले जावे असा आग्रह करत असतात. मात्र शासनाने बदली केल्यानतरही जे अधिकारी पालिकेत सेवा बजावत आहेत त्यांच्याबाबत कोणतेही भाष्य केले जात नाही हे वास्तव आहे.

Web Title: after transfer officers still in municipal corporation in kalyan

टॅग्स

संबंधित बातम्या

नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार

खामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...

सीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे 

नवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...

File photo
अकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ

अकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...

शेतकऱ्यांना भरावे लागणार मुद्रांक शुल्क

पुणे - विशेष नगर वसाहतींमध्ये समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांना विकसकाबरोबर करार केल्यानंतर आर्थिक अथवा भागीदारी स्वरूपात मिळणाऱ्या मोबदल्यावरदेखील आता...

Kalyan Municipal Corporation taken action against Encroachment on Footpath
कल्याणमध्ये महापालिकेने हटविली पदपथावरील अतिक्रमणे

कल्याण : शहरातील पदपथावर फेरीवाले आणि दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना चालता येत नसल्याच्या तक्रारी पाहता पालिका आयुक्त गोविंद बोडके...

baramati
मोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ

बारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...