Sections

माळसेज घाटात भीषण अपघात; दोन ठार

नंदकिशोर मलबारी |   सोमवार, 16 एप्रिल 2018
Accident in malsej two killed

कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक वाढल्याने अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. होणाऱ्या अपघातात एस टी महामंडळाच्या बस चे प्रमाण जास्त असल्याचे बोलले जाते.

सरळगांव - कल्याण- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळसेज घाटात प्रवाशी बस व अल्टो यांच्यात झालेल्या अपघातात 2 जण जागेवर ठार झाले आहेत. मृतांमध्ये 1 महिला व 1 पुरुषाचा समावेश आहे. वेगावर मर्यादा घाला अशी सुचना आगार प्रमुखांना देऊनही अपघात झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.    

कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक वाढल्याने अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. होणाऱ्या अपघातात एस टी महामंडळाच्या बस चे प्रमाण जास्त असल्याचे बोलले जाते. आरनाळा आगाराची प्रवासी बस माळशेच घाट मार्गे अळेफाटा कडे जात होती. तर अल्टो गाडी कल्याण कडे येत असताना प्रवाशी बसने आवळेची वाडी येथे या अल्टो गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत अल्टो गाडीचा चालक व एक महिला जागेवरच ठार झाली. तर त्याच्या समवेत असलेला लहान मुलगा जखमी झाला आहे. बस ने या अल्टो गाडीला दिलेली धडक ही एवढी भिषण होती की या अपघातात मृत झालेल्या चालकास गाडी कटरने कट करून काढावे लागले. अशी माहीती ए. पी. आय. धनंजय पोरे यांनी दिली. या घाटातून वेग वेगळ्या आगारातून प्रवाशी बसची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. हे बस चालक निर्दयपणे बस चालवत असल्याने अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. वारंवार एस टी महामंडळाच्या प्रवाशी बसचे अपघाती बसचे प्रमाण वाढले आहे. अल्टो या गाडीने शिवराम पांडूरंग नवले (वय - 65, रा. बनगेवाडी पारनेर, सुमनबाई शिवराम नवले व गणेश वाफारे हे  कल्याण कडे जात होते. या अपघातात शिवराम नवले व सुमनबाई हे दोघे जागेवरच ठार झाले. तर त्याच्याबरोबर असलेला मुलगा गणेश वाफारे हा जखमी झाला आहे. 

पत्र देऊनही दुर्लक्ष  आतापर्यंत कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर  झालेल्या अपघातात आरणळा आगाराच्या बसचे प्रमाण जास्त आहे. वेळीच आपल्या आगारातील बस चालकांना वेगावर  नियंत्रण ठेवण्यास प्रबोधन करा असे लेखी पत्र देऊनही आगार प्रमुखांनी कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही. आतापर्यंतच्या झालेल्या अपघातात आरळणा आगाराच्या नंबर एक लागतो. - ए पी आय  धनंजय पोरे, टोकावडे पोलिस ठाणे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Accident in malsej two killed

टॅग्स

संबंधित बातम्या

बसच्या चाकाखाली चेंगरून आष्टीत वृद्धा मृत्युमुखी

आष्टी (जि. बीड) : बस आल्याचे धावत निघालेली वृद्धा चालकाला दिसून न आल्याने पुढील चाकाखाली आल्याने चेंगरून जागीच ठार झाली. शहरातील लिमटाका चौकात...

Fifteen million Palladium Carbon theft at Amboyo Mahad
प्लॅटीनम पाठोपाठ एम्बायोत आता 15 लाखाची पॅलॅडियम कार्बनची चोरी 

महाड - महाड औद्योगिक क्षेत्रामधील एम्बायो लिमिटेड या कारखान्यातील प्लॅटीनम चोरीचे प्रकरण गाजत असतानाच पुन्हा याच कारखान्यातून 15 लाख रूपये किमतीचे 15...

Five lakh cheating with woman showing fear of black magic
काळ्या जादूची भीती दाखवत महिलेची 5 लाखांची फसवणूक

इंदिरानगर (नाशिक) - 'तुझ्यावर कुणीतरी काळी जादू केली आहे. त्यामुळे तुला आणि तुझ्या कुटुंबियांना त्रास होत आहे', असे भासवून एका महिलेला सुमारे 5 लाख...

file photo
राजधानीत रुग्णालयामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नवी दिल्लीः राजधानीत एका सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या अकरा वर्षीय मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱयाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे....

दिघंचीतील दरोड्याची टिप थेट जिल्हा पोलिसप्रमुखांना 

दिघंची - दरोडा पडणार अशी टिप थेट पोलिस प्रमुखांनाच मिळाली. त्यानंतर सूत्रे हलली आणि आटपाडी पोलिसांची वाड्या वस्त्यांवर रात्रभर गस्त सुरु झाली. दिघंची...