Sections

साडेबारा लाख रुपये खर्चाची ‘स्वजलधारा’ कुचकामी

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 10 एप्रिल 2018
थेरगाव (ता. पैठण) - गळक्‍या जालना पाइपलाइनच्या व्हॉल्व्हवर पाणी भरण्यासाठी अशी गर्दी होते.

पाचोड - ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी बारा वर्षांपूर्वी थेरगाव (ता. पैठण) येथे साडेबारा लाख रुपये खर्चून राबविण्यात आलेली ‘स्वजलधारा’ पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. अहोरात्र जागता पहारा ठेवत पैठण-जालना पाणीपुरवठा योजनेच्या ‘गळक्‍या’ पाइपलाइनच्या ‘व्हॉल्व्ह’वर तहान भागवावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.

पाचोड - ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी बारा वर्षांपूर्वी थेरगाव (ता. पैठण) येथे साडेबारा लाख रुपये खर्चून राबविण्यात आलेली ‘स्वजलधारा’ पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. अहोरात्र जागता पहारा ठेवत पैठण-जालना पाणीपुरवठा योजनेच्या ‘गळक्‍या’ पाइपलाइनच्या ‘व्हॉल्व्ह’वर तहान भागवावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.

तीन हजार लोकसंख्येच्या थेरगाव येथील ग्रामस्थांना तहान भागविण्यासाठी बारा वर्षांपूर्वी साडेबारा लाख रुपये खर्चाची स्वजलधारा पाणीपुरवठा योजना राबविण्यात येऊन जलकुंभासह गल्लोगल्ली नळाद्वारे पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.  येथील तलाव क्रमांक दोनलगत खोदण्यात आलेली पाणीपुरवठा विहीर हिवाळ्याच्या प्रारंभीच तळ गाठत असल्याने गावांत पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. हे गाव बारमाही टॅंकरवर अवलंबून असून ग्रामस्थ सकाळी शेतावर जाताना सोबत बैलगाडीत ड्रम, टाक्‍या तर कुणी कॅन नेऊन सायंकाळी परतताना त्या शेतातून भरून आणतात.

महिन्याभरापासून टॅंकर सुरू करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र अद्याप टॅंकर सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांची पाणीटंचाईचा मुकाबला करताना दमछाक होत आहे. शासनाने गावांचा पाणीप्रश्न कायम मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेत गावाचा समावेश करावा. - बद्री निर्मळ, सरपंच

Web Title: swajaldhara issue water shortage

टॅग्स

संबंधित बातम्या

dead
पुणे : कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

औंध (पुणे) : मुंबई-बंगळूर महामार्गावर रस्ता ओलांडताना सुतारवाडी जवळ कंटेनरने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली....

pali
रायगड : सुधागड तालुक्यात मतदान शांततेत

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील 7 सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रक्रीया बुधवारी शांततेत पार पडली. दुपारी दिड वाजेपर्यंत एकूण 31.50 टक्के...

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

सांगली महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी अजिंक्‍य पाटील निश्‍चित

सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित...

मालवण येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

मालवण - शहरातील बसस्थानक नजीकच्या समाजमंदिर परिसरात राहणाऱ्या हर्षदा रामचंद्र मालवणकर (वय - २०) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आज सकाळी साडे अकरा...