Sections

रेशीम कोष बाजारपेठेचा प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा |   रविवार, 22 एप्रिल 2018
silk fund market

जालना - बाजार समितीच्या आवारात प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारपेठेचे शनिवारी (ता. 21) राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. रेशीम कोष विक्रीसाठी उत्पादक शेतकऱ्यांना कर्नाटकाला माराव्या लागणाऱ्या चकरा आता कमी होणार आहेत. 

रेशीम कोष बाजारपेठेच्या उद्‌घाटन सोहळ्याला आमदार राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, निमा अरोरा, माजी आमदार संतोष साबरे, सचिव अतुल पाटणी, रामनगरमच्या मार्केटचे उपसंचालक जे. एन. मुन्शी, रेशीमचे मराठवाडा सहायक संचालक दिलीप हाके, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, मनोज मरकड आदींची उपस्थिती होती. 

कार्यक्रमात राज्यमंत्री खोतकर म्हणाले, की राज्यातील पहिली रेशीम कोष बाजारपेठ जालन्यात सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असून रेशीम कोष उत्पादकांना प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

आमदार टोपे म्हणाले, की बाजारपेठ सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे उत्पादन घ्यावे. रेशीम विभागाने दहा शेतकऱ्यांच्या गटालाही नरेगाअंतर्गत मान्यता देण्याची मागणी श्री. टोपे यांनी केली. 

सहा कोटींचा निधी प्राप्त  रेशीमच्या बाजारपेठेसाठी जालन्यात जागा उपलब्ध झाली आहे. त्यासाठी सहा कोटींचा निधीही प्राप्त झाला आहे. पुढील पाच वर्षांत रामनगरमच्या धर्तीवर अद्ययावत बाजारपेठ जालन्यात कार्यान्वित केली जाईल. बाजारपेठ उभारण्यास कालावधी लागेल, त्यामुळे बाजार समिती येथे रेशीम कोष बाजारपेठ तत्काळ सुरू केली आहे, असे राज्यमंत्री खोतकर यांनी सांगितले. 

उद्‌घाटनाला मोठी आवक  जालन्यात रेशीम कोष बाजारपेठेत पहिल्याच दिवशी मराठवाड्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यांतील जवळपास एक हजार उत्पादकांनी पाच हजार किलो कोष बाजारपेठेत विक्रीसाठी आणले होते.

Web Title: silk fund market jalna news

टॅग्स

संबंधित बातम्या

Maoists kill MLA and former MLA
माओवाद्यांकडून आमदार व माजी आमदारची भर चौकात हत्या

विशाखापट्टनम (आंध्रप्रदेश)- माओवाद्यांनी एक आमदार व एक माजी आमदार यांच्यासह चौघांची हत्या केल्याची घटना घडली आहे. त्या दोघांची भर चौकात हत्या...

haribhau bagade
धरण भरेल पण शहाराला पाणी खैरेंच्या आशिर्वादानेच : बागडे

औरंगाबाद : यंदा पहिल्यांदा असे झाले की बाप्पांचे आगमन झाले आणि पाऊस पडला नाही. प्रार्थना करतो की पाऊस पडेल, जायकवाडी पण भरेल. पण खैरे साहेबांनी...

Petrol price regularly hike
देशभरात पेट्रोलची दरवाढ सुरूच 

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोलच्या दरातील वाढ शनिवारी कायम राहिली. पेट्रोलचा दर दिल्लीत आज प्रतिलिटर 82.44 रुपये आणि मुंबईत 89.80 रुपयांवर पोचला....

shriram pawar
हिंदुत्वाचं काँग्रेसी जुगाड... (श्रीराम पवार)

भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण...

महामार्गावरील दरोड्याचा छडा ; कर्नाटकातून आठ जणांना अटक

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्‍यावर कार अडवून आतील लोकांना मारहाण करत त्यांच्याकडील चार लाख 42 हजारांचा ऐवज चोरून पळ काढणाऱ्या...