Sections

पोलिस अधीक्षक कार्यालयासह सर्व पोलिस ठाणी ‘आयएसओ’

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
पोलिस अधीक्षक कार्यालय.

रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याचे काम यानिमित्ताने झाले आहे. पोलिस ठाण्यांत प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून, नागरिकांच्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आयएसओचा मुख्य फायदा कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागली आहे. कर्मचारी अधिक उत्साहाने काम करीत आहेत.
- पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक

उस्मानाबाद - जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांसह पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलिस उपअधीक्षक कार्यालयांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. पोलिस दल गुन्ह्यांचा छडा लावण्याबरोबरच गुणवत्तेबाबत अग्रेसर ठरल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यासाठी प्रयत्न सुरू होते.

पोलिस ठाण्यातील यंत्रणा अद्ययावत करण्यासह सोयी-सुविधांनी सज्ज करण्यासाठी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. त्याचा चांगला परिणाम आता दिसून आला आहे. पोलिस ठाण्याचे रूपडे पालटण्यात यंत्रणेला यश आले आहे. सर्व पोलिस ठाण्याच्या रंगरंगोटीवरच नाही, तर रेकॉर्ड आणि अंतर्गत सुधारणा केल्याने कामाची गती वाढेल, अशी एक अपेक्षा आता व्यक्त होऊ लागली आहे. जिल्ह्यातील १८ पोलिस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाले आहे. ठाणे परिसर सुशोभित करण्याबरोबरच नागरिकांसाठी अनेक सुविधा येथे निर्माण केल्या आहेत. आरोपी कोठडीतही सर्व मूलभूत सुविधा, वीज, सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रारदार यांना बसण्याची व्यवस्था, तसेच वाहनतळ अशा सोयी निर्माण करून दिल्या आहेत. 

पोलिस ठाणे परिसरात विविध जातींची फुलझाडे लावण्यात आली आहेत. सर्वसामान्यांना ठाण्यात आल्यानंतर कायद्याची माहिती व्हावी यासाठी फलक लावण्यात आले आहेत. शिवाय सर्व बीट अंमलदारांची नावे व संपर्क क्रमांक दिल्याने नागरिकांच्या अडचणी कमी होणार आहेत. ठाण्यातील रेकॉर्ड संपूर्ण संगणकीकृत करण्यात आले असून, नागरिकांना गोपनीय माहिती, तसेच सूचना करण्यासाठी तक्रार पेटीची सोय केली आहे.

Web Title: marathi news osmanabad news Superintendent of Police iso

टॅग्स

संबंधित बातम्या

विसर्जनासाठी ‘यिन’चे हात सरसावले

पिंपरी - गणपती विसर्जनासाठी पोलिस फ्रेंड्‌स वेल्फेअर व यिनच्या वतीने मूर्ती दान व वाहतूक नियोजन करण्यात आले. चिंचवड येथील चाफेकर चौक व पवना घाट या...

वाशीत ७१ हजारांचे दागिने पळवले

नवी मुंबई - एका ६२ वर्षांच्या महिलेचे ७१ हजार रुपये किमतीचे दागिने एका भामट्याने लुबाडून नेल्याची घटना गुरुवारी (ता. २०) भरदुपारी वाशीतील सेक्‍...

पोलिसांना ‘घरचा डबा’

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस...

File photo
हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड

हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड नागपूर : हॉटेल गंगाकाशीमधील हायप्रोफाइल सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी...

मिरवणुकीत आपलेपणाचे दर्शन

पुणे - एकीकडे हजारो नागरिक आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देत होते; पण दुसरीकडे कोणी मिरवणूक पाहायला येणाऱ्या भक्तांना अन्नवाटप करत होते, तर कोणी...