Sections

अल्पवयीन मुलांकडूनच सर्वाधिक दुचाकींची चोरी!

मनोज साखरे |   शुक्रवार, 2 मार्च 2018
two-wheeler

औरंगाबाद : तेरा ते एकवीस वयातील मुलांकडूनच सर्वाधिक दुचाकी चोरी होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. आठवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांचा यात सहभाग असून, पोलिस विभागात दुचाकी चोरीवर विशेष काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षण व अभ्यासातून ही बाब समोर आली. याचाच अर्थ मुलं, तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याची ही गंभीर विदारकताच असून, चिंता वाढवणारीही आहे. 
दुचाकी चोरी सहज, तत्काळ होणारी बाब असून, ते सॉफ्ट क्राईम म्हणून ओळखले जाते. सहज साध्य होणाऱ्या गोष्टींकडे अनेकजण आकृष्ट होतात.

औरंगाबाद : तेरा ते एकवीस वयातील मुलांकडूनच सर्वाधिक दुचाकी चोरी होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. आठवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांचा यात सहभाग असून, पोलिस विभागात दुचाकी चोरीवर विशेष काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षण व अभ्यासातून ही बाब समोर आली. याचाच अर्थ मुलं, तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याची ही गंभीर विदारकताच असून, चिंता वाढवणारीही आहे.  दुचाकी चोरी सहज, तत्काळ होणारी बाब असून, ते सॉफ्ट क्राईम म्हणून ओळखले जाते. सहज साध्य होणाऱ्या गोष्टींकडे अनेकजण आकृष्ट होतात.

महाविद्यालयीन जीवनात कुटुंबीयांकडून मिळणारा तोकडा पॉकेटमनी, अवास्तव वाढलेला खर्च भागविण्यासाठी अनेक तरुण या गुन्ह्याकडे वळत आहेत. कमकुवत आर्थिक स्थितीमुळे मुलांना दुचाकी देण्यास कुटुंबीयांची असमर्थता असो, की बहुधा लहान वयात त्यांना दुचाकी देण्याचे टाळणे असो यातून मुलं हौस, क्रेझ पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होतात. गुन्हेगारी प्रवृत्तींसोबत संगत लागली, की प्रसंगी चोरीची वाट पकडून हौस भागवतात. त्यानंतर याच "उद्योगात' रममाण होतात. सहज पैसे मिळवण्याची चटक स्वस्थ बसू देत नाही. त्यातून दुचाकी चौर्यकर्माच्या आहारी जाऊन पोलिसांच्या जाळ्यात सापडतात. पोलिसांच्या हाती लागलेल्यांत अल्पवयीन मुलं व महाविद्यालयीन तरुणांचाच अधिक भरणा असून, ही बाब अस्वस्थ करणारी आहे.  

दुचाकी चोरीनंतर काय?  दुचाकी चोरीनंतर कागदपत्रांशिवाय मिळेल त्या दरात दुचाकींची विक्री केली जाते. त्यातून येणारा पैसा चैनीसाठी वापराला जातो. ही मुलं, तरुण या पैशांतून व्यसन करतात. मौजमस्तीसाठी आणि फिरण्यावर खर्च करतात. मुलींना इम्प्रेस करण्यासाठी, त्यांच्यावरील खर्च भागवण्यासाठी दुचाकी चोरी केल्याची कबुलीही यातील अनेक तरुणांनी पोलिसांकडे दिली. 

ग्रामीण भागात विक्री का?  शहरात चोरी उघड होऊ नये म्हणून गावागावांत गरजू ग्राहकांपर्यंत दुचाकी विक्री केली जाते. यात शेतकरी, श्रमिकवर्गाला स्वस्तात गाडी विकली जाते. महागड्या दुचाकीही आठ ते बारा हजारांपर्यंत मिळत असल्याने; तसेच पोलिसांकडून अडवणूक होणार नाही याची कल्पना असल्याने ग्रामीण भागात दुचाकींची सर्रास खरेदी होते. कधी तोंडी तर कधी बॉंडवरच व्यवहार होतो. 

चोरीच्या दुचाकी जातात कोठे?  दुचाकी चोरी ही देशभरातील डोकेदुखी आहे. यासाठी विशिष्ट गॅंगही काम करतात. दुचाकी चोरीनंतर त्या परराज्यात पाठविल्या जातात. बहुधा दुचाकींचे पार्टस्‌ सुटे केली जाते. दुचाकी व पार्टस्‌ची ट्रकद्वारे इतरत्र वाहतूक होते. स्क्रॅप माल म्हणून खरेदीही होते. काही ठिकाणी प्राप्त चोरीच्या दुचाकींच्या चेसीस क्रमांकांत अफरातफर करून नवीन दुचाकीही तयार केल्या जातात. मध्यप्रदेशातील इंदौर, छिंदवाडा, गुजरात आदी भागांत या दुचाकी पाठवल्या जात असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. 

Web Title: Marathi news marathwada news aurangabad minor boys theft 2 wheelers

टॅग्स

संबंधित बातम्या

राज्यात प्रथमच पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र पोलिसिंग

पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला....

urali-kanchan.jpg
उरुळी कांचनमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

उरुळी कांचन  : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील वापारीमल सावलदास या कपडयाच्या दुकानावर स्थानिक गुंडांच्याकडुन खंडणीच्या उद्देशाने झालेला गोळीबार व...

तुर्काबादला किराणा दुकान फोडून 10 हजारांची चोरी

लिंबेजलगाव : तुर्काबाद खराडी (ता.गंगापुर, जि. औरंगाबाद ) येथे चोरट्यांनी किराणा दुकान फोडुन साहित्यासह 10 हजार रुपये चोल्याची घटना शनिवारी (ता.17)...

44crime_logo_525_1.jpg
शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्‍टरवर गुन्हा 

पिंपरी : शरीर सुखाची मागणी मान्य न केल्यास एका 36 वर्षीय महिलेला बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्‍टराच्या...

vajreshvari.
वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानामध्ये सव्वातीन कोटींचा अपहार

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानात जवळपास सव्वा तीन कोटी रुपयांच्या अपहार झाला आहे. या प्रकरणी विश्वस्थ...

yavat
नांदूरच्या कंपनीतून 'टाईल्स' चोरी करणारी टोळी जेरबंद

यवत - नांदूर (ता. दौंड) येथील टाईल्स कंपनी मधील टाईल्सची चोरी करणारी टोळी यवत पोलिसांनी जेरबंद केली आहे. यासाठी त्यांना स्थानिक पोलिस मित्रांची मोठी...