Sections

बहुजनांनी नाकारली गुढी, फडकविला शिवरायांचा भगवा ध्वज

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 19 मार्च 2018
gudhi

औरंगाबाद : गुढीपाडव्याच्या पूर्व दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली होती. त्यामुळे यावर्षी मराठवाड्यातील बहुतांश बहुजन कुटुंबीयांनी पारंपरिक गुढी न उभारता रविवारी (ता. 18) आपल्या घरांवर एकपाती भगवी पताका उभारून संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. शहराबरोबरच ग्रामीण भागात यंदा मोठ्या प्रमाणात परिवर्तन दिसून आले.

औरंगाबाद : गुढीपाडव्याच्या पूर्व दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली होती. त्यामुळे यावर्षी मराठवाड्यातील बहुतांश बहुजन कुटुंबीयांनी पारंपरिक गुढी न उभारता रविवारी (ता. 18) आपल्या घरांवर एकपाती भगवी पताका उभारून संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. शहराबरोबरच ग्रामीण भागात यंदा मोठ्या प्रमाणात परिवर्तन दिसून आले.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये चैत्र प्रतिपदा या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते. महाराष्ट्रात त्याला "गुढीपाडवा', तर कर्नाटक व आंध्रप्रदेशात "उगादी' म्हणतात. अनेकजण या दिवसाला शुभमुहूर्त मानून नवीन खरेदीही करतात; पण वर्ष 1689 मध्ये गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. परिणामी, हा दिवस स्वराज्यासाठी अशुभ ठरला. त्यामुळे महाराजांची स्मृती कायम राहावी, यासाठी यंदा गुढी उभारू नये, असे आवाहन बहुजन संघटनांनी सोशल मीडियातून केले. त्याला प्रतिसाद देत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील अनेक बहुजन कुटुंबीयांनी गुढीऐवजी एकपाती भगवी पताका फडकविली. शिवाय संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करून नवीन खरेदी, गोडधोड करण्याचेही टाळले. 

व्हायरल मेसेजचा परिणाम  गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांची हत्या झाली. त्यामुळे हा दिवस अशुभ आहे. एवढेच नाही, तर मंगलकार्यात कलश सरळच असतो; पण नेमका तो गुढीपाडव्यालाच उटला का टांगला जातो, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कडुनिंबाचा पाला घरी आणला जातो. एवढेच नाही, तर बांबूचा वापर हा तिरडीसाठी केला जातो. या सगळ्या बाबी संभाजी महाराजांच्या हत्येशी संबंधित असून, अशुभ आहेत. त्यामुळे गुढीऐवजी घरावर भगवा ध्वज फडकवून संभाजीराजांना अभिवादन करावे, असा मेसेज काही दिवासांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता.

Web Title: marathi news marathawada gudhi padwa sambhaji maharaj

टॅग्स

संबंधित बातम्या

नाशिक - सामाजिक कार्याची दखल घेऊन येथील सुयोग सुरेश जोशी फाऊंडेशनतर्फे नीलम राणे यांना महाराष्ट्राची दुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नीलम राणे यांना महाराष्ट्राची दुर्गा पुरस्कार

तळेरे - वैभववाडी तालुक्‍यातील कोकिसरे येथील नीलम राणे यांना महाराष्ट्राची दुर्गा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून विविध...

"ई फार्मसी'विरुध्द 28 सप्टेंबरला बेळगाव जिल्ह्यातील मेडिकल बंद 

बेळगाव - केंद्र सरकारतर्फे "ई फार्मसी' व्यवस्था जारी करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्याला औषध दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. 28 सप्टेबरला औषध...

वैराग येथील एका बोगस भोंदू डॉक्टरला अटक

वैराग - वैद्यकिय व्यवसाय करण्यासाठी वैद्यकिय 'शिक्षण, पदवी, व ज्ञान नसताना डॉक्टर असल्याचे भासवून रूग्णावर उपचार करून त्यांची फसवणूक करुन...

Marathi actress mrunmayee kolwalkars bollywood debut
मराठी 'मिस मॅच'नंतर मराठमोळी मृण्मयी थेट बॉलीवुडमध्ये

प्रिया बापट, सई ताम्हणकर नंतर आता आणखी एक मराठी चेहरा बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. मराठी अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर ही लवकरच बॉलिवूडमधून ...

ग्रंथालय कर्मचार्‍यांचे रत्नागिरीत आंदोलन

रत्नागिरी - राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांतील कर्मचार्‍यांना किमान वेतनापेक्षाही कमी वेतन सध्याच्या परिरक्षण अनुदान रचनेनुसार मिळते. त्यात जीवनमान व...