Sections

महापालिकेचा जीव भांड्यात

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
Aurangabad-Municipal

औरंगाबाद - केंद्र शासनाच्या पथकामार्फत करण्यात येणारे स्वच्छ सर्वेक्षण अखेर लांबणीवर पडले आहे. शहराची कचराकोंडी झाल्याने सर्वेक्षण लांबणीवर टाकण्यात यावे, अशी मागणी महापालिकेने राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार आता केंद्राचे पथक पाच मार्चला शहरात येणार आहे. 

औरंगाबाद - केंद्र शासनाच्या पथकामार्फत करण्यात येणारे स्वच्छ सर्वेक्षण अखेर लांबणीवर पडले आहे. शहराची कचराकोंडी झाल्याने सर्वेक्षण लांबणीवर टाकण्यात यावे, अशी मागणी महापालिकेने राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार आता केंद्राचे पथक पाच मार्चला शहरात येणार आहे. 

केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत मिशनअंतर्गत देशभरातील चार हजार ४१ शहरांचे स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जानेवारीत बहुतांश शहरांमध्ये केंद्र शासनाच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात आले; मात्र औरंगाबादचा दुसऱ्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी (ता. २६) हे पथक शहरात येणार होते; परंतु नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपोच्या विरोधात पंचक्रोशीतील नागरिकांनी आंदोलन सुरू केल्यामुळे शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. गेल्या अकरा दिवसांत कचराकोंडी फुटली नसल्याने शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. नेमक्‍या याच वेळी केंद्राचे पथक दाखल होणार असल्याने महापालिकेचे टेन्शन वाढले होते.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने राज्य शासनाला शहरात निर्माण झालेल्या कचराकोंडीची माहिती दिली. कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागणार असल्याने पाहणी दौरा पुढे ढकलण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली होती. ती मान्य करण्यात आली असून, आता येत्या पाच मार्चपासून पथक औरंगाबाद शहरात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.

असे मिळणार गुण  स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया प्रकल्प, लोकसहभाग, अस्वच्छतेच्या तक्रारींचा निपटारा यांसह इतर निकषांवर हे सर्वेक्षण होऊन गुणांकन ठरणार आहे. यंदा ही स्पर्धा चार हजार गुणांची आहे. यातील एक हजार गुण हे कागदोपत्री अहवालास आहेत. अठराशे गुण हे लोकसहभाग आणि तक्रार निवारणाला आहेत. उर्वरित बाराशे गुण हे प्रत्यक्ष पाहणीला आहेत. दीडशे गुण हे स्वच्छता ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करण्यासाठी आहेत.

Web Title: marathi news aurangabad news municipal cleaning survey

टॅग्स

संबंधित बातम्या

The sand smuggling in Atapalli taluka administration ignored the mafia
एटापल्ली तालुक्यात वाळू तस्करी जोमात; प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

एटापल्ली (जि. गडचिरोली) - तालुक्यात विविध शासकीय इमारती, रस्ते, नाली व खासगी इमारतीं बांधकामे गेली वर्षभरापासून केली जात आहेत.  या...

Parbhani Womens agitation on Friday for the government college
परभणी : शासकीय महाविद्यालयासाठी शुक्रवारी महिलांचे घेराव आंदोलन

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी समस्त परभणीकरांच्या वतीने आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. आंदोलनाचा तीसरा टप्पा शुक्रवारी (ता. 21)...

wani
सराड-वणी राष्ट्रीय महामार्गचे काम बाधीत शेतकऱ्यांनी पाडले बंद

वणी (नाशिक) : गुजरात राज्यातील सोनगड ते पिंपळगाव बसवंत या दरम्यानचा नव्याने जाहिर झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 953 वरील सराड ते...

Sakal Yin arranged Nirmalya compilation at Solapur
निर्माल्य संकलनासोबतच 'सकाळ यिन' करणार स्मार्ट सिटीचा जागर! 

सोलापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिन सदस्य विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करणार आहेत. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यंदा निर्माल्य संकलनासोबतच...

kalas
इंदापुरात पाणी आणण्यासाठी असावी लागते मनगटात ताकद

कळस : इंदापूर तालुक्यात ज्याच्या मनगटात ताकद व अंगात पाणी आहे तोच कालव्याला पाणी आणू शकतो. निष्क्रीय माणूस पाणी आणू शकत नाही. आम्ही केवळ रास्तारोको...