Sections

सोशल मीडियावर मराठी भाषेचाच बोलबाला

राजेभाऊ मोगल |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
marathi social media

शासकीय व निमशासकीय कार्यालयांत मराठी भाषेचाच वापर व्हायला हवा. कष्टकऱ्यांचे बॅंकांमध्ये खाते असल्याने त्यांचा सातत्याने तिथे संबंध येतो. मात्र, आजही त्यांच्याशी मराठीत नव्हे तर इंग्रजी भाषेतूनच व्यवहार होतो. अनेकांना पासबुकवरील नोंदी कळत नसल्याने इतरांकडे विनवणी करावी लागते. त्यामुळे मराठीतून बोलणे, लिहिण्याचा आग्रह धरण्याचा रेटा वाढायला हवा. - प्राचार्य रा. रं. बोराडे, ज्येष्ठ साहित्यिक

औरंगाबाद - जागतिकीकरणात मराठी भाषेचे अस्तित्व कसे टिकणार, भाषा जगवावी लागेल, अशी कितीही कोरडी ओरड सुरू असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमात चर्चेसाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी सर्वाधिक मराठी भाषा वापरली जात आहे. यामुळे ई-बुक, मराठीच्या विविध साईट्‌सवर तरुण मंडळी सर्च करत वाचन करीत आहेत. श्रेष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरी केली जाते. मागील काही वर्षांत रिमिक्‍सच्या युगात शुद्ध मराठी भाषेची अपेक्षा कशी ठेवायची, आपल्या मायबोलीचे कसे होणार, अशा शंका उपस्थित करीत गळे काढले जात आहेत. मात्र, सर्वाधिक वेगाने एकमेकांपर्यंत संदेश पोचविण्याचे माध्यम असलेल्या सोशल मीडियावर केवळ मराठी बोलणारीच नव्हे तर सतत इंग्रजीत बोलणारी तरुणाई मराठीमध्येच लेखन करीत आहे. त्यामुळे जवळपास 80 टक्‍क्‍यांहून अधिक मोबाईलधारक मराठी टायपिंगचे ऍप वापरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही बाब अभिमानाची व कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेबद्दल मराठी माणसांच्या मनात किती प्रेम आहे, हे शुभेच्छांच्या देवाण-घेवाणीवरून पाहायला मिळते. झपाट्याने बदलणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात बदल स्वीकारतच पुढे जावे लागणार, हे सत्य आहे. बदलाची कास धरूनच पुढे जाणे क्रमप्राप्त ठरत असताना "जुने ते सोने' या म्हणीप्रमाणे तसेच तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या साधनांमुळे मराठी भाषेचाच बोलबाला बघायला मिळत आहे. सरकारी कार्यालयांत भाषेबद्दल अनास्था बॅंकांसह राज्य सरकार, केंद्र सरकारच्या कार्यालयांत अमराठी अधिकाऱ्यांचा भरणा आहे. अशा ठिकाणी सामान्य माणूस आपले काम घेऊन गेला असता त्यांच्या मराठी बोलीभाषेकडे वेगळ्या नजरेतून पाहिले जाते. विशेषत: जर अर्ज, पत्रव्यवहार मराठीतून केला असता, जणू काही चूकच केलीय, असे निरीक्षण केले जाते, असा अनुभव अनेकजण सांगतात. मराठीचे फारसे ज्ञान नसल्याने बॅंकांमध्ये तर पासबुक व अन्य कामकाजात अनंत चुका केल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकारी कार्यालयांतच भाषेबद्दल अनास्था असल्याचे स्पष्ट होते. शासकीय व निमशासकीय कार्यालयांत मराठी भाषेचाच वापर व्हायला हवा. कष्टकऱ्यांचे बॅंकांमध्ये खाते असल्याने त्यांचा सातत्याने तिथे संबंध येतो. मात्र, आजही त्यांच्याशी मराठीत नव्हे तर इंग्रजी भाषेतूनच व्यवहार होतो. अनेकांना पासबुकवरील नोंदी कळत नसल्याने इतरांकडे विनवणी करावी लागते. त्यामुळे मराठीतून बोलणे, लिहिण्याचा आग्रह धरण्याचा रेटा वाढायला हवा. - प्राचार्य रा. रं. बोराडे, ज्येष्ठ साहित्यिक.

Web Title: Marathi News Aurangabad News Marathi Language Day social media

टॅग्स

संबंधित बातम्या

A man arrested for ATM Fraud in Daund
दौंडमध्ये एटीएम अपहारप्रकरणी एकाला अटक

दौंड ( पुणे) : दौंड शहरात एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली ७ लाख ९३ हजार रूपयांची रोकड आणि संगणक साहित्य असा एकूण ९ लाख ९३ हजार रूपयांचा अपहार...

pune
शेतकरी उत्पादक संस्थेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांनाच व्हावा : केंद्रीय कृषी राज्यमंत्री

पुणे (औंध) : "बाजारात विक्री करतांना शेतकऱ्यांनी गटांच्या स्वरुपात एकत्र येऊन विक्री व पुरवठ्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांचे दिवस बदलतील....

Avinash Dharmadhikaris Shiv Chhatrapati Lecturement at Latur
लक्षात ठेवा, खचण्यातच खरा पराभव असतो : अविनाश धर्माधिकारी

लातूर : स्पर्धा परीक्षेत अपयश आले म्हणून देदिप्यमान बुद्धीमत्ता असलेली मुलेसुद्धा खचतात. मी इतका अभ्यास केला, मला काय मिळाले ? असे म्हणतात आणि मोडून...

India wins the match but fans lose to this cute Pakistani girl
Asia Cup 2018 : सामना एकीकडे अन् सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच

दुबई : आशिया कप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. भारत पाकिस्तान सामना म्हटले की, प्रेक्षकांसाठी...

Congress Trying to establish power in Goa
गोव्यात काँग्रेसचा 'हात' सत्तेसाठी सरसावला

पणजी : काँग्रेसच्या गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसचे प्रभारी डॉ. ‌ए. चेल्लाकुमार गोव्यात पोहोचले आहेत. काँग्रेसने सरकार...