Sections

सात वर्षांपासून परसबागेत कचऱ्यापासून विनाखर्च खतनिर्मिती

सुषेन जाधव |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
औरंगाबाद - परसबागेत कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविताना प्रकाश कदम.

शहरात सध्या कचऱ्याचा प्रश्‍न जटिल बनला आहे. प्रत्येकाने असा प्रयोग केल्यास दुहेरी फायदा तर होईलच; परंतु नारेगावमध्ये आंदोलनामुळे रस्त्यावर जे कचऱ्याचे ढीग पडले आहेत, ते होणार नाहीत. उलट कचऱ्यापासून खतनिर्मिती केल्यास फायदाच होणार आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे हे पहिले पाऊल म्हणता येईल.
- प्रकाश कदम, पुंडलिकनगर.

औरंगाबाद - दिवसेंदिवस चिंतेचा बनत चाललेला कचऱ्याचा प्रश्‍न, त्यावर तोडगा निघण्याऐवजी रोज नवीन समस्या उद्भवत आहेत; मात्र पुंडलिकनगर भागातील रहिवासी प्रकाश कदम यांनी तब्बल सात वर्षांपूर्वीच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबरोबरच लाभदायी ठरणारा खतनिर्मितीचा पर्याय शोधून काढला आहे. त्यांनी घराच्या परसबागेत कचऱ्याची विल्हेवाट लावत चक्क कचऱ्यापासून खतनिर्मिती केली आहे. या खतामुळे परसबागेतील झाडे फुला-फळांनी डवरली असून, ही सेंद्रिय फळे पाहून इतरांनीही हा विनाखर्च खतनिर्मितीचा धडा घेतला आहे. 

प्रकाश कदम यांनी नोकरी सांभाळून घराच्या परसबागेकडेही चांगले लक्ष दिले आहे. दरम्यान दररोज महापालिकेची कचरा गाडी आली, की घरात निघणारा अर्धा - एक किलो ओला-सुका कचरा घेऊन जाणे त्यांना पटले नाही. यावर त्यांना एक कल्पना सुचली. ती म्हणजे कचरा व्यवस्थापनातून खतनिर्मिती. यासाठी काहीही खर्च नसल्याने ही कल्पना त्यांनी तातडीने अमलातही आणली. कचऱ्यापासून केलेल्या खतनिर्मितीमुळे परसबागेतील फुलझाडांना आलेली फुले, फळझाडांना आलेली फळे सेंद्रिय आहेत. समस्येविषयी ओरड करण्यापेक्षा त्यावर स्वतः मार्ग काढण्याचा वस्तुपाठ त्यांनी दिला आहे. या खतनिर्मितीमुळे चिकू, आंबा, डाळिंब, पेरू, फुलझाडे आदींना फायदा झाला आहे. 

अशी केली खतनिर्मिती   घरातील ओला- सुका कचरा एकत्र करून परसबागेत दीड फूट लांबी-रुंदीचा खड्डा घेतला. त्यात आठवडाभराचा सात -आठ किलो कचरा टाकला. त्यावर माती टाकली. पाण्याचा शिडकावा मारला. साधारण १७ ते १८ दिवसांनी कचऱ्याचे उत्तमोत्तम खत झाले. परसबागेत पुन्हा दुसऱ्या ठिकाणी खड्डा घेऊन परत तीच कृती केल्याने पूर्ण परसबागेतील फळझाडे, फुलझाडांना त्याचा फायदा झाला आहे. घरात येणारी कॅरिबॅगही सात वर्षांपासून बंद केल्याचे श्री. कदम यांनी सांगितले.

रेनवॉटर हार्वेस्टिंगने केले बोअर पुनर्भरण  श्री. कदम यांनी पावसाळ्यात इमारतीवरून पडणारे पाणीही वाया जाऊ दिलेले नाही. रेनवॉटर हार्वेस्टिंग करून बोअर पुनर्भरणाचा प्रयोग केल्याने बोअरलाही पाणी कमी पडले नसल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी केवळ अकराशे रुपये खर्च आला आहे.

Web Title: marathi news aurangabad news garbage fertilizer generation

टॅग्स

संबंधित बातम्या

water tanker
राज्यात टँकरची हजाराकडे वाटचाल 

सोलापूर : सद्यस्थितीत राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये एकूण 692 पाणी टॅंकर सुरु झाले आहेत. त्यामध्ये 567 गावे आणि एक हजार 117 वाड्यांवर टॅंकरद्वारे पाणी...

Pomegranate
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात घसरली

पुणे - निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक अॅसिडच्या कमाल उर्वरित अंशाची मान्यता पातळी द्राक्षापेक्षाही जादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे देशाची...

pata-varvanta.
मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून

पाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि...

Dal
डाळींमधील तेजी भावाची हमी देणार?

पुणे - डाळींच्या भावात निर्माण झालेली तेजी ही शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून, ग्राहकांनाही रास्त भावात डाळी उपलब्ध करून...

Superhero superhero! (Forward)
सुपरहिरोंचा सुपरबाप! (अग्रलेख)

बालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...

टंचाई आराखड्यातील कामे सुरू करा

पुणे - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजन करावे, त्यासाठी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित कामे...