Sections

बारसे उरकलेल्या बाळाचा जन्म कधी?

सकाळ वृत्तसेवा |   मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018
शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या इमारतीचे संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद  - दोन वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या राज्य कर्करोग संस्थेच्या भूमिपूजनाचे सोपस्कार केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते पंधरा दिवसांपूर्वी पार पडले. ३८.६० कोटी रुपयांच्या बांधकामाची प्रशासकीय मान्यता मिळालेली नसताना हे जन्मापूर्वी बारशाची घाई करण्यात आल्याचा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणला होता. पंधरा दिवस उलटल्यावरही अद्याप प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने बारसे झालेले बाळ जन्माला कधी येणार? असा सवाल उपस्थित होत आहे. 

औरंगाबाद  - दोन वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या राज्य कर्करोग संस्थेच्या भूमिपूजनाचे सोपस्कार केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते पंधरा दिवसांपूर्वी पार पडले. ३८.६० कोटी रुपयांच्या बांधकामाची प्रशासकीय मान्यता मिळालेली नसताना हे जन्मापूर्वी बारशाची घाई करण्यात आल्याचा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणला होता. पंधरा दिवस उलटल्यावरही अद्याप प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने बारसे झालेले बाळ जन्माला कधी येणार? असा सवाल उपस्थित होत आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शंभर खाटांच्या स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाला २१ सप्टेंबर २०१२ रोजी सुरवात झाली. नेत्रदीपक कामगिरीची दखल घेत कुटुंब व आरोग्य कल्याण विभागामार्फत नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबेटिस, सीव्हीडी आणि स्ट्रोक (एनपीसीडीसीएस) या कार्यक्रमाअंतर्गत राज्य कर्करोग संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. शहरात झालेल्या १५ ऑक्‍टोबर २०१६ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याअंतर्गत केंद्राकडून १२० कोटी रुपयांचा निधी विस्तारीकरणासाठी मंजूर झाला. त्यातील पहिला टप्पा ४३ कोटींचा निधी सात महिन्यांपूर्वी मिळाला. त्यातून १६५ खाटांची व्यवस्था व अत्याधुनिक उपचार उपलब्ध करण्यात येणार आहे; मात्र लगीनघाई केल्याने ३८.६० कोटींच्या बांधकामाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित असताना ११ फेब्रुवारी २०१८ रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचे सोपस्कार उरकण्यात आले. पंधरा दिवस उलटूनही राज्य कर्करोग संस्थेच्या बांधकामाला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नसल्याचे समोर आले आहे.

अजून पंधरा दिवस लागणार? भूमिपूजनानंतर यासंबंधी प्रशासनाकडे विचारणा केली असता तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. सतत दोन सुट्या आल्याने प्रशासकीय मान्यतेचा अधिकृत अध्यादेश निघालेला नाही. लवकरच अधिकृत अध्यादेश मिळेल, असे सांगण्यात आले होते. त्यास पंधरा दिवस उलटले. तर अधिवेशन सुरू झाल्याने अजून पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली. बांधकामाचा आराखडा तयार आहे. त्यालाही अद्याप मान्यता मिळालेली नसल्याची माहिती आहे. 

‘डीएमआरई’ची तत्त्वतः मान्यता मिळालेली आहे. ३५ कोटींहून अधिकचा विषय असल्याने उच्चाधिकार समितीकडे हा प्रस्ताव गेला आहे. अर्थमंत्री, अर्थसचिव, जीएडी, एमईडी आणि मुख्यमंत्रीस्तरावर हा निर्णय लवकरच होणार आहे. निधी मिळाला आहे. त्यामुळे काम गतीने होईल. - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

Web Title: marathi news aurangabad news born baby birth cancer hospital

टॅग्स

संबंधित बातम्या

#PmcIssues 'स्मार्ट' पुण्याची टॉयलेट्‌स मात्र 'वर्स्ट' ! 

पुणे : तुटलेले दरवाजे, पाण्याचा अभाव, खिडक्‍यांच्या फुटलेल्या काचा, नळच गायब... जागोजागी कचरा..... हे आहे चित्र शहरातील महिलांच्या सार्वजनिक...

प्रवास भाड्यात दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला 

पुणे : इंधनाच्या वाढत्या दरवाढीमुळे आर्थिक बोजा पडतो म्हणून प्रशासनाने प्रती टप्पा सुचविलेली दोन रुपयांची दरवाढ पीएमपीच्या संचालक मंडळाने...

औरंगाबादची हवा हानिकारक

औरंगाबाद- शहरात वावरत असताना आपण घेत असलेला श्वास हा रोगांचे ओझे लादणारा ठरतो आहे. शहराच्या हवेत रोगांचा राबता असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद...

पालिका आयुक्तांविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार : स्वराज

मुंबई : पालिकेतील अनुसूचित जातींच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांबाबत पालिका आयुक्त आणि प्रशासनाबरोबर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला...

vijay tarawade
आठवणी...साहित्याच्या, साहित्यिकांच्या (विजय तरवडे)

मॅजेस्टिक बुक स्टॉलनं आयोजिलेल्या ‘साहित्यिक गप्पां’च्या एका कार्यक्रमात श्री. ज. जोशी यांची प्रकट मुलाखत होती. मुलाखत खुमासदार झाली. मुलाखतीत एका...

dr sanjay dhole
अतिसूक्ष्म विज्ञानाची गरुडझेप (डॉ. संजय ढोले)

नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते...