Sections

वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले

सकाळ वृत्तसेवा |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
औरंगाबाद - चिकलठाणा पुलावर शनिवारी मध्यरात्री पडलेली अपघातग्रस्त दुचाकी.

औरंगाबाद - अनोळखी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी (ता. २४) मध्यरात्री चिकलठाणा बाजारपट्टीलगत पुलावर घडली. सुनील मोहन भारती (वय ३८, रा. सावित्रीनागर, चिकलठाणा) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, भारती हे चिकलठाणा येथील एका कंपनीतून काम आटोपून दुचाकीने घरी जात होते. बाजारपट्टीलगत पुलावरून जाताना मागून एक वाहन भरधाव वेगाने आले. त्या वाहनाने भारती यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरात होती, की भारती हे दुचाकीवरून उडून रस्त्याच्या मधोमध पडले. 

यानंतर त्यांच्या डोक्‍यावरून वाहनाचे चाक गेले. चिरडल्यानंतर  मदतीसाठी थांबण्याऐवजी वाहनचालक काही एक न बघता सरळ पसार झाला. अपघात घडल्याची बाब दिसल्यानंतर एका दुचाकीस्वाराने गस्तीवर असलेले पोलिस नाईक गणपत बायस यांना माहिती दिली. बायस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच अपघातस्थळी धाव घेत भारती यांना घाटीत नेले. भारती मृत असल्याने त्यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक केदारे यांनी दिली. या अपघाताची नोंद सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली.

आधार हरवला  भारती हे एका मद्य कंपनीत कामगार होते. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी दोन मुलं असून, मुलगी बारावीला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने भारती कुटुंबीयांचा आधारवड कोसळला. सुनील यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून सावित्रीनगरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: marathi news aurangabad news bike accident

टॅग्स

संबंधित बातम्या

गारगोटी येथे शाळकरी मुलीचा होरपळून मृत्यू

गारगोटी -सोनारवाडी (ता. भुदरगड) येथे शिवाजी पांडुरंग ऱ्हाटवळ यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. यात शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपूर्वा...

drown
गणेश विसर्जनादरम्यान तीन मुले गेली वाहून

पांढरकवडा : येथील खुनी नदीवरील महादेव घाटावर गणेश मूर्तीचे विसर्जन करताना अचानक नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने तीन मुले वाहून गेली. ही घटना...

गोकुळ वार्षिक सभाः सभास्थळ २४ तास आधी पोलिसांनी ताब्यात घ्यावे

कोल्हापूर - ‘कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेत रविवारी (ता. ३०) सभास्थळ चोवीस तास...

नक्षलवादी होण्यासाठी ऑफर

नगर - दरोडा, खुनाच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार पपड्या ऊर्फ संजय ऊर्फ राहुल व्यंकटी काळे (मूळ रा. सलाबतपूर, ता. नेवासे, सध्या रा. सुदर्शननगर,...

टिमकी, ताशांचा जोर

नवी मंबई - गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे डीजेचा दणदणाट असे समीकरण अनेक वर्षांपासून आहे. त्याला नवी मुंबईत हे वर्ष अपवाद ठरले. नाशिक ढोलसह टिमकी-...