Sections

भारतीय लष्कराच्या प्रयत्नातून खडकावरही फुलतेय "नंदनवन' 

अतुल पाटील |   शुक्रवार, 6 एप्रिल 2018
army

अब्दीमंडीतील वृक्षारोपण आणि संवर्धनाचा पाच वर्षांचा उपक्रम आहे. "इको बटालियन'ने आतापर्यंत 23 हजार 5 झाडे लावली आहेत. माजी सैनिकांना पुनर्वसनाची संधी आणि वृक्षारोपण हे दोन्ही उद्देश यातून साध्य होत आहेत. 
- कर्नल व्यंकटेश पी., कमांडिंग ऑफिसर, इको बटालियन.

औरंगाबाद - दौलताबाद किल्ल्यासमोरील मोमबत्ता तलावाभोवतीची 65 हेक्‍टर जमीन भारतीय लष्कर हिरवीगार करत आहे. डोंगरातील खडक फोडून शास्त्रीय पद्धतीने लावलेली इवलीशी 23 हजार रोपटी आता माणसाएवढ्या उंचीची होऊन डोलू लागली आहेत. माजी सैनिकांच्या प्रयत्नांतून अवघ्या पाच-सहा महिन्यांत ही किमया साधली गेली. 

वन विभागाच्या अब्दीमंडीच्या गट क्रमांक 14 येथील 65 हेक्‍टर जागेवर भारतीय संरक्षण विभागाअंतर्गत स्थापन केलेल्या "इको-बटालियन'तर्फे वृक्षारोपण सुरू आहे. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा एकमेव उपक्रम आहे. भारतीय सेनेतून निवृत्त झालेल्या सुमारे 150 सैनिकांनी जुलै ते नोव्हेंबर 2017 दरम्यान पहिल्या टप्प्यात 36 प्रकारची 23 हजार 5 झाडे लावली होती. 

तापमान चाळिशीकडे झुकलेले असताना झाडांची काळजी शास्त्रीय पद्धतीने घेतली जाते. झाडांना आळे करणे, खत टाकणे, पाणी देणे तसेच पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी डोंगरावरील गवत कापून झाडांच्या बुंध्यापाशी टाकायची कामे नियमित केली जातात. 

136 इंफन्ट्री बटालियन (प्रादेशिक सेना) महार रेजिमेंटचे कर्नल व्यंकटेश पी. हे कमांडिंग ऑफिसर आहेत. त्यांच्यासोबत लेफ्टनंट कर्नल कुलदीपसिंग चौहान, मेजर करण कदम, मेजर पृथ्वीराज चव्हाण तसेच मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, उपवनसंरक्षक सतीश वडसकर हे प्रयत्नशील आहेत. वनविभाग आणि भारतीय संरक्षण विभागाच्या संयुक्‍त विद्यमाने हा उपक्रम राबवला जातोय. 

ही आहेत झाडे  लिंब, वड, पिंपळ, चिंच, विलायती चिंच, सीताफळ, बाभूळ, आंबा, आवळा, करंजी, बांबू, सिसम, मोह, सप्तपर्णी, जांभूळ, पळस, बेहाडा, सौंदड, शिवबाभळ, बेल, बकुळ, गुलमोहर, आफ्रिकन साग आदी 36 प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. 

अब्दीमंडीतील वृक्षारोपण आणि संवर्धनाचा पाच वर्षांचा उपक्रम आहे. "इको बटालियन'ने आतापर्यंत 23 हजार 5 झाडे लावली आहेत. माजी सैनिकांना पुनर्वसनाची संधी आणि वृक्षारोपण हे दोन्ही उद्देश यातून साध्य होत आहेत.  - कर्नल व्यंकटेश पी., कमांडिंग ऑफिसर, इको बटालियन. 

Web Title: marathi news aurangabad news army area Trees planting

टॅग्स

संबंधित बातम्या

Injured commander Abhilash Tomy to be rescued
कमांडर अभिलाष टॉमी यांची सुखरुप सुटका

नवी दिल्ली : हिंदी महासागरात स्पर्धेदरम्यान जखमी होऊन तीन दिवस अडकून पडलेले भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांची आज सुटका करण्यात आली. अभिलाष...

imran khan
इम्रान यांची मुजोरी (अग्रलेख)

पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चेला नकार देण्याखेरीज भारतासमोर दुसरा पर्याय नव्हता. उभय देशांदरम्यान संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावयाची...

‘विराट’ घेण्यास महाराष्ट्र इच्छुक 

मुंबई : भारतीय नौदलात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या विराट या युद्धनौकेचा ताबा घेण्यास महाराष्ट्र सरकार इच्छुक आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारच्या...

पोलिसांना ‘घरचा डबा’

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस...

दोन टन निर्माल्याचे झाले संकलन 

सातारा - "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातर्फे अनंत चतुर्दशीला येथील संगम माहुली (ता....