Sections

औरंगाबाद- बाहा स्पर्धेत 'जिका' ठरले उपविजेते 

अतुल पाटील |   शुक्रवार, 16 मार्च 2018
marathi news aurangabad baha sae competition winner government college students

मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या स्पर्धेत सहभागी होणेदेखील अभिमानाची गोष्ट असते, त्या स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची (जिका) 'आर्यन्स्‌ टीम' उपविजेता ठरली आहे. याशिवाय इतर तीन प्रकारातही प्रथम पारितोषिके पटकावली आहेत. महाविद्यालयातर्फे रेल्वेस्थानकांवरच जंगी स्वागत केल्याने विद्यार्थीही भारावले होते. 

औरंगाबाद : मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या स्पर्धेत सहभागी होणेदेखील अभिमानाची गोष्ट असते, त्या स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची (जिका) "आर्यन्स्‌ टीम' उपविजेता ठरली आहे. याशिवाय इतर तीन प्रकारातही प्रथम पारितोषिके पटकावली आहेत. महाविद्यालयातर्फे रेल्वेस्थानकांवरच जंगी स्वागत केल्याने विद्यार्थीही भारावले होते. 

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगतर्फे (एसएई) "बाहा एसएई' ही देशपातळीवरील स्पर्धा आयआयटी रोपर (पंजाब) येथे 8 ते 11 मार्च दरम्यान पार पडली. स्पर्धेत कोईम्बतूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला; तर द्वितीयस्थानी जिकाने बाजी मारली. स्पर्धेतील पाच प्रकारात तीन ठिकाणी जिकाने वर्चस्व गाजवत प्रथम पारितोषिके मिळवली. यात "ऍक्‍स्लेरेशन'मध्ये 5.427 सेकंदात 150 फुटाचा ट्रॅक पूर्ण केला. "सस्पेंशन ऍण्ड ट्रॅक्‍शन'मध्ये तीन सेकंदात ट्रॅक पूर्ण केला. "रफ्तार'प्रकारात गाडीचे कमी वजन आणि ऍक्‍स्लरेशनच्या वेळेवरून बक्षीस दिले जाते, यात गाडीचे वजन 139 किलो तर, ऍक्‍स्लरेशनची वेळ 5.427 सेकंद भरली. वरील तिन्ही प्रकारात प्रथम पारितोषिक पटकावताना प्रत्येकी 50 हजार रुपये पारितोषिक मिळवले. एकूणच स्पर्धेतील द्वितीय पारितोषिकाचे एक लाख रुपये असे एकत्रित अडीच लाख रुपयांची कमाई विद्यार्थ्यांनी केली आहे.  व्हर्च्युअल स्पर्धेत देशभरातून 400 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यातून 200 जण निवडले होते. पहिल्या टप्प्यातील 140 संघांची स्पर्धा इंदोरमध्ये जानेवारीत पार पडली. तर नुकतीच 60 संघांची स्पर्धा आयआयटी रोपरला पार पडली. त्यासाठी मेकॅनिकल विभागाचे डॉ. संजय चिकलठाणकर, फॅकल्टी ऍडव्हायजर एम. जी. राठी, फॅकल्टी को-ऑर्डिनेटर के. एस. वासनकर यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांचे आधी रेल्वेस्थानकावर स्वागत करण्यात आले. नंतर आई-वडिलांसह टीम आर्यन्स्‌च्या सदस्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. 

No automatic alt text available.
 टीम आर्यन्स्‌चे शिलेदार  जिकाने "ऑल टरेन व्हेईकल' प्रकारात "एक्‍स कॅलिबर' ही गाडी बनविली होती. जिकाच्या आर्यन्स्‌ टीमने एप्रिल 2017 पासून डिझाइन, ऑगस्टपासून मॅन्यूफॅक्‍चरिंगला सुरवात करत डिसेंबरच्या सुरवातीलाच गाडी तयार केली होती. त्यासाठी 25 जणांची टीम झटत होती. यात, अजिंक्‍य उरगुंडे (कर्णधार) विकास खोचरे, सौरभ चव्हाण (चालक), योगेश माळी, स्तवन कुलकर्णी, सौरभ केलानी, शुभम पवार, मनोज चव्हाण, ऋषिकेश देशमुख, महेश बनकर, तेजस महालपुरे, अथर्व गुप्ता, अक्षय शिरसाट, ओमकार जाधव, सुमित पाटील, आनंद परांडे, मंदार देवडीकर, आदित्य ढोबळे, वैष्णवी पाटील, केतकी दातार, परिक्षित मोटे, धीरज शिंदे, बसवराज केटे, शंतनू सोनवणे यांचा समावेश आहे.

Web Title: marathi news aurangabad baha sae competition winner government college students

टॅग्स

संबंधित बातम्या

31dead_body_
डोंगरावरून उडी मारून युवकाची आत्महत्या 

पुणे : धायरी गावाजवळ असलेल्या डोंगरावरून उडी मारून युवकाने आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली असली तरी आत्महत्या चार ते पाच...

सीएमई सबवे पूर्ण 

पिंपरी - लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील (सीएमई) सबवेचे काम पूर्ण झाले असून, त्यालगतच्या जोडरस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. जानेवारीच्या...

court
Maratha Reservation : आरक्षण विरोधी याचिका सादर; तूर्तास स्थगिती नाही

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका आज (बुधवार) मुंबई उच्च न्यायालयात सादर...

File photo
राज्यात महाभरती, पालिकेचा पदभरतीचा प्रस्ताव धूळखात

नागपूर : महापालिकेत दर महिन्याला 20 ते 25 अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत असून अनेकांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. निवृत्त अधिकारी,...

#IITStudents IIT पुणेकरांचे शतक

पुणे : देशातील 23 भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) प्रवेश घेण्याची "क्रेझ' वाढत आहे. मात्र, दोन वर्षांपासून असणारे तिसऱ्या क्रमांकाचे...

दुरुस्ती वाहनच रुळावरून घसरले ; वाहतुकीचा चार तास खोळंबा

पालघर : पालघर आणि केळवे रेल्वेस्थानकांदरम्यान रूळ दुरुस्ती करणारे उदवाहन यंत्रच (कॅम्पिंग मशीन) रुळावरून घसरल्याने शनिवारी सकाळी पश्‍चिम...